केस वाळवण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेली आणि पाय घसरून चौथ्या मजल्यावरून पडली : नशीब बलवत्तर म्हणून वाचली

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे-केस वाळवण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेलेल्या दहावीत शिकणाऱ्य मुलीचा पाय घसरल्याने ती चौथ्या मजल्यावरून खाली पडली परंतु नशीब बलवत्तर म्हणून ती बाल बाल बचावली. पुण्यातील शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंट ही थरारक घटना घडली.

सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ऋतुजा जगदाळे असं मुलीचं नाव असून ती इयत्ता दहावीत शिकते. याच अपार्टमेंटमध्ये तिचे वडील  वॉचमनचं काम करतात. गेल्या सहा वर्षापासून ते या इमारतीत राहतात. मात्र, ऋतुजा जगदाळे या दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत आज साकळी 9 वाजता एक धक्कादायक घटना घडली. ती केस वाळवण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेली होती. टेरेसवरील ग्रीलला धरून ती उभी राहिली होती. मात्र तिला काही समजण्याच्या आतच तिचा पाय घसरला आणि ती तशीच खाली आली.खाली कोसळताना ऋतुजा ती चौथ्या मजल्याच्या सज्जावर जाऊन अडकली. ही मुलगी काही सेंटिमीटर जागेमधे उभी असल्याने पाहणाऱ्यांचा थरकाप उडाला. त्यानंतर या मुलीला वाचवण्यासाठी लोकांनी गर्दी केली.

इमारतीतील लोकांनी आधी टेरेसवरून साडी खाली सोडली आणि या मुलीला वरती खेचण्याचा प्रयत्न केला. पण घाबरल्यामुळे ही मुलगी साडी पकडू शकत नव्हती. त्यामुळे त्यांना तिची सुटका करता आली नाही. त्यानंतर लोकांनी अग्नीशमन दलाला या मुलीची सुटका करण्यासाठी बोलवले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आधी शिडीच्या सहाय्याने मुलगी जिथे अडकली होती तिथपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. पण शिडी चौथ्या मजल्याच्या खिडकीपर्यंत पोहचू शकली नाही.

त्यानंतर सचिन मांडवकर आणि कैलास पायगुडे हे अग्नीशमन दलाचे दोन जवान या पाच मजली इमारतीच्या टेरेसवर गेले आणि कमरेला दोर बांधून ते चौथ्या मजल्याच्या छज्यावर उतरले. त्यानंतर त्यांनी त्या मुलीच्या कमरेलाही दोरी बांधली आणि ते मुलीला घेऊन शिडीवरून सुखरुप खाली उतरले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *