नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनो सावधान.. आपलीही होऊ शकते आर्थिक फसवणूक


पुणे— आपण नोकरीच्या अथवा आहे त्या नोकरीपेक्षा चांगली नोकरीपेक्षा शोधात असाल आणि त्यासाठी ऑनलाइन शोधाचा मार्ग निवडत असाल तर सावधान…. आपली मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे. नोकरी मिळवण्याच्या नादात आपल्याला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असून अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. नाहीतर सायबर चोरट्यांकडून आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रात समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचा परिणाम रोजगारावरही झाला आहे. त्यामुळे चांगल्या नोकरीच्या शोधासाठी ऑनलाइन शोध घेतला जात आहे.नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांकडून गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे मोठी आर्थिक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. अशाच प्रकारे पुण्यातील हडपसर भागातील एका महिलेला नामांकित कंपनीचे आमिष दाखवून तीची 12 लाखाची फसवणूक सायबर चोरट्यांनी केली आहे.

अधिक वाचा  कापड व्यापाऱ्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपच्या माजी उपमहापौराला अटक

एका महिलेला नामांकित कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तब्बल ११ लाख ९९ हजार ६११ रुपये भरायला भाग पाडले. याप्रकरणी मगरपट्टा येथील ४३ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही महिला सध्या एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहे. तिला आणखी चांगली नोकरी हवी असल्याने तिने नोकरी डॉट कॉमवर नाव नोंदणी केली होती. तिला २१ मे रोजी फोन आला़ रिक्रुटमेंट इन डिड या रिक्रुटमेंट एजन्सीमधून बोलत असल्याचे भासविले. तिला नामांकित कंपनीत नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले.

श्रृती नायर, रोहित गुप्ता, प्रतिक वर्मा, आनंद, सुधांशु मिश्रा अशा वेगवेगळ्या नावाने त्यानंतर तिला फोन करण्यात आले. नोकरीसाठी रजिस्टेशन, ऑनलाईन मुलाखत, प्रोसेसिंग फी व इतर वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून ७ ते ८ वेळा एकूण ११ लाख ९९ हजार ६११ रुपये रिक्रुटमेंटइनडिड या या वेबसाईटवरील लिंकवर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यापैकी ३ लाख ३९ हजार १४ रुपये परत केले. परंतु कोणतीही नोकरी न देता फिर्यादी महिलेने ट्रान्सफर केलेली ८ लाख ६० हजार ५९७ रुपये परत न करता फसवणुक केली. आपली फसवणुक होत असल्याचे लक्षात आल्यावर तिने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी प्राथमिक तपास करुन हा गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग केला असून पोलीस निरीक्षक एच़ टी़ कुंभार अधिक तपास करीत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love