कोव्हॅक्सिनसाठी खा.बापट यांचे केन्द्राला साकडे


पुणे- कोव्हॅक्सिन या भारतीय बनावटीच्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी विनंती खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना केली.तसे पत्र बापट यांनी तातडीने डाॅ.हर्ष वर्धन यांना पाठविले आहे. या पत्रात त्यांनी कोव्हॅक्सिन  लसीबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. भारत बायोटेक यांनी निर्माण केलेल्या या लसी ला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता घेण्यासाठी जी कार्यप्रणाली आहे त्यात आपण सहभागी व्हावे अशी अपेक्षा बापट यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.कोव्हॅक्सिन घेतलेल्या प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येत नाही.त्यामुळे पर्यटनाला खीळ बसली आहे. याकडे लक्ष वेधून भारत बायोटेकची ही लस अत्यंत प्रभावी आहे. तिला राष्ट्रीय विषाणू संस्था तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मान्यता दिली आहे.या मुद्यावर बापट यांनी भर दिला आहे.

अधिक वाचा  खासदार गिरीश बापट यांचे निधन

 अनेक देश पूर्णपणे लसीकरण केलेल्या परदेशी प्रवाशांना सध्या परवानगी देत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. पर्यटनाला चालना देत आहेत. तथापि कोव्हॅक्सिनला मान्यता नसल्याने भारतातील प्रवासी पर्यटनापासून वंचित राहत आहेत.तसेच अन्य कारणांसाठी परदेशात जाणा-या प्रवाशांनाही  अडचणी येत आहेत. म्हणून कृपया आपण भारत बायोटेकच्या प्रस्तावात लक्ष घालावे व जागतिक आरोग्य संघटनेची या प्रस्तावाला मान्यता मिळेल. यासाठी प्रयत्न करावे  असे बापट यांनी या पत्रात नमूद केले आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. जय शंकर यांनाही स्वतंत्रपणे हे पत्र पाठविण्यात आले आहे.एका  पत्रकाद्वारे खा.बापट यांनी ही माहिती दिली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love