अखिल भारतीय खाटीक समाज पुणे शहर अध्यक्षपदी शिवाजीराव कोथमिरे यांची एकमताने निवड

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे -अखिल भारतीय खाटीक समाज पुणे शहर अध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष शिवाजीराव कोथमिरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय खाटीक समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या कोअर कमिटीची ऑनलाईन सभा दिनांक ९ मे २०२१ रोजी पार पडली त्यामध्ये कोथमिरे यांची एकमताने निवड करण्यात आली.

संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष संजय घोलप, प्रदेश सरचिटणीस सुजित धनगर, प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष  गणेश घोडके, संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी प्रमुख सौ.  मैनाताई साबने, संघटनेचे युवा प्रकोष्ट प्रदेश अध्यक्ष बंटी शेठ निकुडे पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.  महाराष्ट्रातील समाजातील करोणा काळात निधन पावलेल्या सर्व समाज बंधू-भगिनींना श्रद्धांजली वाहून पुढील प्रमाणे नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

शिवाजीराव कोथमिरे हे मूळचे संगमनेर (जि. अहमदनगर) येथील रहिवासी आहेत. विद्यार्थी दशेपासून सामाजिक कामामध्ये आणि चळवळींमध्ये त्यांचा सहभाग राहील आहे. पुण्यामध्ये शिक्षणासाठी आल्यानंतर पुण्यातच एक व्यावसायिक म्हणून ते पुणेकर झाले. कोथमिरे यांचे संपूर्ण कुटुंब सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. खाटीक समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या शिवाजीराव कोथमिरे यांनी मटन व्यावसायिकांच्या  समस्या, समाजातील महिलांचे सबलिकरण, समाजातील शैक्षणिक समस्या, जातीचे दाखल्या संदर्भात येणाऱ्या अडचणी, समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आणि समाज मंदिर निर्माण करण्यासाठी सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. संघटनेच्या वरिष्ठांनी जो विश्वास मी आणि माझ्या नवनियुक्त कार्यकारणीवर दाखवला तो आम्ही सार्थकी ठरवू असे सांगून त्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.                 

नवनिर्वाचित कार्यकारिणी   

  • शिवाजीराव कोथमिरे – पुणे शहर अध्यक्ष, अखिल भारतीय खाटीक समाज संघटना
  • विक्रांत कांबळे- सरचिटणीस, पुणे शहर, अखिल भारतीय खाटीक समाज संघटना
  • अविनाश जाधव आणि धनंजय गाढवे- उपाध्यक्ष, पुणे शहर, अखिल भारतीय खाटीक समाज संघटना
  • सौ. माधुरीताई निकुडे(अध्यक्षा अहिल्या व्यासपीठ पुणे शहर संचालिका/मुख्याध्यापिका प्रगती शिक्षण संस्था संत तुकाराम विद्या प्रस्तुत प्रतिष्ठान हायस्कूल) – महिला आघाडी अध्यक्ष, पुणे शहर, अखिल भारतीय खाटीक समाज संघटना
  • कुमार सिद्धेश कांबळेपुणे शहर युवक अध्यक्ष,  अखिल भारतीय खाटीक समाज संघटना
  • हर्षल कोथमिरे – कोथरूड विभाग युवा अध्यक्ष, अखिल भारतीय खाटीक समाज संघटना

संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संजय घोलप, प्रदेश सरचिटणीस सुजित धनगर, प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश घोडके सौ महिला आघाडी प्रमुख मैनाताई साबने,  बंटी शेठ निकुडे पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवा प्रकोष्ठ यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *