विरोधक म्हणजे ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) – संजय राऊत

राजकारण
Spread the love

पुणे-“करोना महामारीच्या काळात मुंबईतील चांगल्या कामाची जागतिक आरोग्य संघटना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकजणांनी दखल घेतली. या कामाचे विशेष कौतुक केले आहे, मात्र एवढं चांगलं काम केलं तरी विरोधक टीका करतात. त्याकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष द्यावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) आहेत,” अशा शब्दात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधला. सकारात्मक राहून काम करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

पुण्यातील येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटरचे ऑनलाइन उद्घाटन  राऊत यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, शिवसेनचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक ॲड. अविनाश साळवे उपस्थित होते.

या कोविड सेंटरमध्ये करोनाचा संसर्ग झालेल्या बालकांसाठी विशेष बालकक्ष आहे. यामध्ये ४० खाटा बालक आणि त्यांच्या पालकांसाठी आहेत. यावेळी संजय राऊत म्हणाले, “करोनाच्या महामारीत प्रत्येक ठिकाणी सरकार पोहचेल याची खात्री देता येत नाही. तर दुसऱ्या लाटेत सामाजिक संस्था असो, की सर्वसामान्य व्यक्ती झोकून देऊन काम करीत आहेत. शहर आणि ग्रामीण भागात रुग्णालय उभारून रुग्णांना सेवा देणे ही मोठी राष्ट्रसेवा आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *