खासदार गिरीश बापट यांचे निधन

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे- पुणे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट वय (७३) यांचे दिनानाथ हॅास्पिटल मध्ये दिर्ध आजाराने दुःखद निधन झाले. राजकारणातील गेल्या पाच दशकातला विरोधी व सत्ताधारी भाजपाचा दमदार नेता हरपला अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

नगरसेवक ते आमदार खासदार या पदा मुळे पक्षाची पुणे शहर व पुणे जिल्ह्यात मजबुतीचे व ताकदवान संघटन उभे करणारा असे व्यक्तिमत्व कायम स्मरणात राहिल .

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालया उपचार सुरू होते.  उपचारादरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधी संध्याकाळी ७   वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. १९७३  पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  पुण्यातील कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती.

राजकीय कारकीर्द…

टेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. 1983 ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1993 ला झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिलं नाही.1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते.  राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *