पुणे -कोरोनाच्या गर्दीवरून अजित पवारांनी नागरिकांना सुनावलं. बाबांनो, माझी विनंती आहे, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून लाट येणार आहे. खूप काळजी घेण्याची गरज आहे. अधिवेशनात मला म्हणाले, की मी सभागृहात आल्यापासून ते जाईपर्यंत मास्क लावलेला असतो. बोलताना काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहे. आपणच नियम पाळत नसू तर लोकांना सांगायचा अधिकार नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे असेही अजित पवार म्हणाले.
निर्बंधांबाबत सरकारला विचार करावा लागेल
मी, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनीही सांगितलं की कोरोनाचे रुग्ण वाढल्यावर कुठल्याही राज्यात, देशपातळीवर निर्बंध करावेच लागतील कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर कुठल्याही राज्यकर्त्याला निर्बंध कठोर करावेच लागतात. पुणे, मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी देखील कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. आपल्या घरातील नागरिकांना देखील याची बाधा होत आहे. ओमायक्रॉनचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. मी तर नेहमीच मास्क वापरण्याबाबत काटेकोरपणे सर्वांत सांगत आलो आहे. मुंबई आणि पुण्यात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढते आहे. त्यामुळे निर्बंधांबाबत सरकारला विचार करावा लागेल. ओमायक्रॉनची तीव्रता सौम्य असली तरी तो कोरोनाच आहे हे जनतेनं लक्षात घ्यावं. त्यामुळे जास्तीत जास्त काळजी बाळगणं गरजेचं आहे. राजकीय नेत्यांनीही लग्न समारंभांबाबत जरा सामाजिक भान राखून निर्णय घ्यावेत, असं अजित पवार म्हणाले.
लग्नात कोणी बोलवतं. ते आम्हाला सांगताना सर्व नियमांचे पालन केले आहे असं सांगतात गर्दी केलेली नाही अस सांगतात पण तिथे गेल्यावर चित्र वेगळेच दिसते. मग आता आम्हालाच स्वत: ला बंधन घालून घ्यावी लागेल. आम्हालाच घराबाहेर पडता येणार नाही. त्यानंतर मीडियात वेगळ्या बातम्या सुरु होतील की हेच घरात बसून आहेत अशी टिप्पणी त्यांनी केली.