gtag('js', new Date());
  • महत्वाच्या बातम्या
    • क्राईम
    • क्रीडा
    • शिक्षण
    • तंत्रज्ञान
    • आरोग्य
    • अर्थ
  • महाराष्ट्र
    • पुणे-मुंबई
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • लेख
  • English News
  • ई-दिवाळी अंक
  • अन्य
    • लाईफ स्टाईल
    • हिंदी खबरे
    • करियर
    • नोकरी धंदा
    • बिझनेस
    • भविष्य
    • व्हायरल
    • अध्यात्म
शोधा
Thursday, September 24, 2026
  • जाहिरातीसाठी संपर्क
  • दिवाळी अंक २०२५
 News24Pune
  • महत्वाच्या बातम्या
    • क्राईम
    • क्रीडा
    • शिक्षण
    • तंत्रज्ञान
    • आरोग्य
    • अर्थ
  • महाराष्ट्र
    • पुणे-मुंबई
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • लेख
  • English News
  • ई-दिवाळी अंक
  • अन्य
    • लाईफ स्टाईल
    • हिंदी खबरे
    • करियर
    • नोकरी धंदा
    • बिझनेस
    • भविष्य
    • व्हायरल
    • अध्यात्म
मुख्य पृष्ठ पुणे-मुंबई पैशाच्या हव्यासापायी वैष्णवीचा बळी: हुंड्यासाठी सासरच्यांकडून अमानुष छळ: पित्याचा आक्रोश
  • पुणे-मुंबई
  • महत्वाच्या बातम्या

पैशाच्या हव्यासापायी वैष्णवीचा बळी: हुंड्यासाठी सासरच्यांकडून अमानुष छळ: पित्याचा आक्रोश

प्रतिनिधी
News24Pune
-
May 22, 2025
शेअर
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Linkedin
Telegram
    पैशाच्या हव्यासापायी वैष्णवीचा बळी
    पैशाच्या हव्यासापायी वैष्णवीचा बळी
    Spread the love

    Post Views: 3,431

    पुणे(प्रतिनिधि)–लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत, कसपटे कुटुंबाची कन्या वैष्णवी हगवणे हिचा संशयास्पद मृत्यूची दुर्दैवी घटना घडली आहे. वैष्णवीचे वडील आणि आई आपल्या लेकीला गमावल्याच्या असह्य वेदनेत आहेत. अश्रू अनावर झालेल्या स्थितीत त्यांनी वैष्णवीने सासरच्यांकडून सहन केलेला अमानुष छळ आणि हुंड्यासाठीच्या सततच्या मागण्यांसंदर्भात धक्कादायक माहिती दिली आहे. केवळ पैशांच्या हव्यासापोटी आपल्या मुलीचा बळी घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

    लग्नानंतर काही महिन्यांतच छळाला सुरुवात

    वैष्णवीचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर अवघ्या पाच ते सात महिन्यांतच तिच्या सासरच्यांकडून छळ सुरू झाला, असे तिच्या वडिलांनी सांगितले. सुरुवातीला, पालकांना त्रास होऊ नये म्हणून वैष्णवीने काहीही सांगितले नाही, कारण तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केले होते. मात्र, जेव्हा तिच्या सासरच्यांनी चांदीच्या गौरायांची मागणी केली आणि मातीच्या गौराया देण्याऐवजी चांदीच्या गौराया मागत असल्याचे तिने रडत रडत सांगितले, तेव्हा पालकांना पहिल्यांदाच तिच्यावरील त्रासाची कल्पना आली.

    सततच्या मागण्या आणि अवाजवी हुंडा

    सासरचे लोक सतत पैशांची आणि वस्तूंची मागणी करत होते. वैष्णवी घरी दीड-दोन महिन्यांनी आली की, काहीतरी मागायची आणि तिचे वडील तिला पाहिजे तसे पन्नास हजार ते एक लाख रुपये देत असत. लग्नावेळी वैष्णवीच्या वडिलांनी ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची पाच पाच ताटे (प्रत्येकी ५-७ किलो), पाच सात किलोची चांदीची भांडी दिली होती. श्रावण मासाला अंगठी, चांदीचे ताट, अधिक मासासाठी अनेक वस्तू दिल्या होत्या. तरीही त्यांचा हव्यास वाढतच गेला असे त्यांनी सांगितले.

    अधिक वाचा  नाटकांतून इतिहासाचा विपर्यास किंवा खलप्रवृत्तीचे उदात्तीकरण कदापि होता कामा नये- शरद पवार

    मानसिक आणि शारीरिक छळ

    वैष्णवीचा सासरच्यांकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. तिची सासू तिला स्वयंपाक येत नाही, साफसफाई येत नाही म्हणून सतत टोचत असे. याबाबत विचारणा केली असता, ‘आमच्याकडे तीन तीन बायका कामाला आहेत, तिला काय काम पडतं?’ असे उत्तर मिळत असे. मारहाण केवळ एकदाच झाली नाही, तर वारंवार होत होती. दोन महिन्यांपूर्वी तिच्या नणंदेने तिला खूप मारले आणि तिच्या तोंडावर थुंकले होते. सासू आणि नणंद दोघींनी मिळून तिला गाडीतून बालेवाडीपर्यंत आणले होते, जिथे तिचा खूप छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून वैष्णवीने गाडीतच नदीत उडी मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी जावई, नणंद आणि सासूचे पाय धरून आपल्या मुलीचा संसार वाचवण्याची विनंती केली होती असे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले.

    अधिक वाचा  दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची कोणतीही चर्चा चालू नाहीये : जयंत पाटील

    दोन कोटी रुपयांची मागणी आणि आत्महत्येचा प्रयत्न

    दोन-चार महिन्यांपूर्वी जावयाने वैष्णवीच्या वडिलांकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली. त्याला घोटावडे भागात प्लॉट घ्यायचा होता. वडिलांनी एवढी मोठी रक्कम नसल्याचे सांगितले, तेव्हा जावयाने वडिलांच्या जॉइंट व्हेंचर पार्टनरकडे जाण्याची धमकी दिली आणि वडिलांना ओळख करून देण्यास सांगितले. दोन दिवसांनी पार्टनरचा फोन आला आणि त्यांनी जावयाने दोन कोटींची मागणी केल्याची खात्री केली असे ही वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले.

    यापूर्वी, नोव्हेंबर २०२३ मध्येही वैष्णवीने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ती तीन महिन्यांची गर्भवती होती. पती-पत्नीमध्ये फोनवर भांडण झाले होते. वादाचे कारण जावयाने ‘हे बाळ माझे नाहीये’ असे म्हणणे असल्याचे सांगितले जाते. विष घेतल्यानंतर वैष्णवीने स्वतःहून याबद्दल सांगितले. नणंद आणि जावयाने तिला एआयएमएस रुग्णालयात नेले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर बिल वडिलांनी भरले, तर सासरचे लोक रात्री उशिरा निघून गेले. तीन दिवसांनी वैष्णवीला घरी आणण्यात आले, मात्र या काळात सासरच्यांपैकी कोणीही तिला भेटायला आले नाही.

    अधिक वाचा  नालेसफाईत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, दोषींवर कठोर कारवाई करा: मुरलीधर मोहोळ यांचे महापालिकेला सक्त निर्देश

    नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल

    अलीकडेच नणंदेने वैष्णवीला झिंज्या धरून मारहाण केली होती, ज्यामुळे वैष्णवीने नणंदेवर आणि संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल केला होता. याच कुटुंबातील मोठ्या सुनेनेही यापूर्वी असाच गुन्हा दाखल केला असून, ती आपल्या माहेरी राहत असल्याची माहिती आहे.

    इतर पालकांसाठी संदेश

    वैष्णवीच्या दुर्दैवी घटनेतून सर्वांनी धडा घेण्याची गरज आहे, असे तिचे वडील म्हणाले. त्यांनी इतर पालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या मुलीचे दुःख ऐकून घ्यावे, तिची मनस्थिती समजून घ्यावी. तसेच, मुलींनीही आई-वडिलांना आपल्यासोबत घडत असलेले सर्व काही स्पष्टपणे आणि मनमोकळेपणाने सांगावे, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या इज्जतीसाठी दीड वर्ष सर्व काही पोटात ठेवल्यामुळे आणि मागण्या पूर्ण करत राहिल्यामुळे आज आपली मुलगी हयात नाही, असे त्यांनी वेदनेने सांगितले. वैष्णवीचा बळी हुंड्यासाठीच घेतला गेला, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

    Like
    50% LikesVS
    50% Dislikes

    Spread the love
    • टॅग
    • आत्महत्या (Suicide) सासरचा छळ (In-laws Harassment)
    • कसपटे कुटुंब (Kasapte Family)
    • कौटुंबिक संबंध (Family Relations)
    • कौटुंबिक हिंसाचार (Domestic Violence)
    • गुन्हेगारी (Criminality)
    • न्याय (Justice)
    • पीडित कुटुंब (Victim Family)
    • पुणे (Pune)
    • पुणे क्राईम (Pune Crime)
    • पोलीस तपास (Police Investigation)
    • भावनिक शोषण (Emotional Abuse)
    • महिलांवरील अत्याचार (Atrocities Against Women)
    • वैवाहिक वाद (Marital Dispute)
    • वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane)
    • सामाजिक समस्या (Social Issue)
    • हुंडाबळी (Dowry Death)
    • हुंडाविरोधी कायदा (Anti-Dowry Law)
    मागील बातमी खगोलशास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. जयंत नारळीकर अनंतात विलीन
    पुढील बातम्या वैष्णवी हगवणे हिचे लहान बाळ अखेर तिच्या माहेरच्या कुटुंबीयांच्या ताब्यात
    News24Pune
    https://news24pune.com

    संबंधित बातम्या अधिक बातम्या

    Modi's guarantee
    महत्वाच्या बातम्या

    मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना पवारांचा टोला :ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? शरद पवारांनी दिली थेट प्रतिक्रिया

    आता 'विजयरथ' असेल की 'अंत्ययात्रारथ', हे सरकारनेच ठरवावे
    पुणे-मुंबई

    वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही – मनोज जरांगे पाटील

    निलम गोऱ्हे यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा
    महत्वाच्या बातम्या

    तर.. मयुरीला तिच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता.. : निलम गोऱ्हे यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा

    Follow Us

    [slide-anything id=”13045″]

    सहकारी साखर कारखान्यांसाठी राज्य सरकारची ‘सॉफ्ट लोन योजना’ जाहीर : ऊस...

    September 22, 2026

    जवाहर नगर गणेशोत्सव मंडळातर्फे भव्य रक्तदान व महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

    September 20, 2026

    युपीआय व्यवहारांवर खरोखरच कर लागणार? जाणून घ्या एनपीसीआय आणि एमडीआर शुल्काचे...

    September 16, 2026

    ओझोन थराची मोठी झीज भरून निघतेय; २०६६ पर्यंत पूर्ण पूर्ववत होण्याची...

    September 16, 2026

    पुण्यात गणेशोत्सवात उकडीच्या मोदकांचा सुवास: ‘माधुर्य केटरर्स’कडून रोज हजार मोदकांची निर्मिती...

    September 16, 2026
    राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://news24pune.com/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत.
    महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.
    संपर्क करा: news24pune1@gmail.com

    POPULAR POSTS

    On the occasion of the Palkhi ceremony, the combined banner of political leaders of the Pawar family was displayed in Baramati

    पालखी सोहळ्यानिमित्त पवार कुटुंबांतील राजकीय नेत्यांचा एकत्रित बॅनर बारामतीमध्ये झळकला

    July 6, 2024
    Jain boarding land scam

    Jain boarding land scam: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्यावर थेट कारवाईची...

    October 24, 2025
    Sachin Dodke BJP Entry Dispute

    सचिन दोडकेंचा भाजप प्रवेश? : मुरलीधर मोहोळ आणि भीमराव तापकीर यांच्यात...

    December 7, 2025

    POPULAR CATEGORY

    • पुणे-मुंबई2007
    • राजकारण1339
    • महत्वाच्या बातम्या964
    • महाराष्ट्र710
    • क्राईम401
    • लेख209
    • शिक्षण208
    • देश-विदेश166
    • आरोग्य141
    • About
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    © Copy Right@News24Pune
    पुणे-मुंबई

    पैशाच्या हव्यासापायी वैष्णवीचा बळी: हुंड्यासाठी सासरच्यांकडून अमानुष छळ: पित्याचा आक्रोश

    by News24Pune time to read: <1 min
    पुणे-मुंबई वैष्णवी हगवणे हिचे…
    पुणे-मुंबई खगोलशास्त्रज्ञ आण…
    • 0
    • 0
    • 0
    0
    अधिक गोष्टी

    पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची विक्रमी ३० तासानंतर सांगता

    September 10, 2022
    बांगलादेशातील वंशविच्छेदा विरोधात कॅंडलमार्च

    बांगलादेशातील वंशविच्छेदा विरोधात कॅंडलमार्च

    August 11, 2024
    ×

    No WhatsApp Number Found!

    WhatsApp us