खेळाबरोबर शिक्षण अत्यंत महत्वाचे : आयरनमॅन कौस्तूभ राडकर यांचा सल्ला


पुणे- जीवनात यशस्वी होण्यासाठी खेळा बरोबर शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. कठिण परिश्रम, खिलाडीवृत्ती व आनंदाने खेळ खेळल्यास यश त्याचा पदरी पडते. त्यामुळे खेळ आणि शिक्षण कधीही सोडू नका. असा सल्ला ३३ वेळा आयरनमॅन ट्रायथलॉन झालेले कौस्तूभ राडकर (kaustubh Radkar) यांनी खेळाडूंना दिला.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या १६वी राष्ट्रीय पातळीवरील क्रीडास्पर्धा एमआयटी डब्ल्यूपीयू ‘समिट-२०२३’ या क्रीडास्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माजी भारतीय टेनिस खेळाडू गौरव नाटेकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड हे होते.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, प्र-कुलगुरू डॉ. तपण पांडा, कुलसचिव गणेश पोकळे, डब्ल्यूपीयूचे क्रीडा संचालक प्रा. डॉ.पी.जी.धनवे, स्पर्धेचे सल्लागार मंदार ताम्हाणे व योगेश नातू, प्रविण पाटील, पी.जी.भीडे व विलास कथुरे उपस्थित होते.

अधिक वाचा  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशाला दिशा देणारे विद्यापीठ-डॉ. भूषण पटवर्धन

उद्घाटन समारंभात समारंभात क्रीडा क्षेत्रात भरीव कामगीरी केल्याबद्दल भारतीय स्प्र्रींट लिंगेन रमेश तावडे यांना एमआयटी-डब्ल्यूपीयू क्रीडा महर्षि पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र व पदक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

कौस्तूभ राडकर म्हणाले, ३३वेळा आयरनमॅन ट्रायथलॉन मिळण्याचा बहुमान मिळविणारा मी एकमात्र भारतीय व्यक्ती आहे. ही स्पर्धा जगात अत्यंत कठीण मानली जाते. त्यात स्वीमिंग, सायकलिंग सारख्या खेळांचा समावेश असतो. विद्यार्थ्यांना जीवनाता एक तरी खेळ खेळावा. त्याचबरोबर आपल्या शिक्षणाला अधिक प्राथमिकता दयावी.

गौरव नाटेकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात सतत खेळत रहा. जीवनात चढ-उतार येतच असतात. त्यामुळे व्यवस्थापन करायला शिका.

प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड म्हणाले, विद्यार्थ्यांनी शरीराने तंदुरूस्त ,मनाने सतर्क, अध्यात्मिक दृष्य उन्नत आणि कुशाग्र बुध्दीमत्ता असणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानदांनी ही सांगितले की युवकांनी खेळाच्या मैदानात उतरावे. विद्यार्थ्यांनी चारित्र्यवान तसेच शिस्तबद्ध असल्यास जीवनात यश मिळते.

अधिक वाचा  ऑलिंपिकमधील भारताच्या सहभागाची शताब्दी

राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, राष्ट्रउभारणीसाठी खेळाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. शिक्षणाबरोबरच मुलांनी एक तरी खेळ खेळावा.

मनोज तावडे यांनी एमआयटी डब्ल्यूपीयू येथे चालणार्‍या या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात.

या स्पर्धेत पुणे विभागातून ४० अभियांत्रिकी महाविद्यालये, उर्वरित महाराष्ट्रातून १०, इतर राज्यातील ३ महाविद्यालय, तसेच पुण्यातील खाजगी विद्यापीठे १०, महाराष्ट्रातून ४, बाहेरच्या राज्यातील ७ विद्यापीठे सहभागी झाले आहेत. या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मिळून एकूण सुमारे ३,६०० स्पर्धक भाग घेतला.

डॉ. तपण पांडा यांनी सर्व खेळाडूंचे स्वागत करून समिट २०२३ ला शुभेच्छा दिल्या. तसेच सांगितले की नकारात्मक उर्जेला सकारात्मक उर्जेत परिवर्तन करा.

दिया कौल यांनी स्पोर्टस रिपोर्टचे वाचन केले.

सिध्दार्थ गाडिलकर व जान्हावी भोसले यांनी सूत्रसंचालन केले. आर्यन यादव यांनी आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love