जितो स्पोर्टस्‌‍च्या माध्यमातून रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत 4 जूनला योगसाधना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : जितो स्पोर्टस्‌‍च्या सहकार्याने जगविख्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत दि. 4 जून 2023 रोजी योगसाधना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन पुणे जीतो चॅप्टरने जितो स्पोर्टस्‌‍च्या माध्यमातून केलेले आहे, अशी माहिती जितो ॲपेक्सचे उपाध्यक्ष कांतिलाल ओसवाल यांनी निवेदनाद्वारे दिली.

कार्यक्रम पहाटे 5 वाजता सहकार नगर येथील स. दू. शिंदे मैदानावर होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, मात्र पूर्व नोंदणी आवश्यक आहे. आपले स्वास्थ उत्तम व आरोग्यदायी ठेवण्यासाठी योगसाधनेचे महत्त्व या विषयावर योगगुरू बाबा रामदेव नागरिकांना मार्गदर्शन करणार असून त्यांच्यासमवेत योगसाधना-प्राणायाम करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. जागतिक योगदिन 21 जून रोजी असतो. योग दिनानिमित्त पुण्यात दि. 4 जून रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

जितो स्पोर्टस्‌‍ ॲपेक्सचे चेअरमन विशाल चोरडिया, जितो पुणे चॅप्टरचे चेअरमन राजेश सांकला,जितो पुणे चॅप्टरचे चिफ सेक्रेटरी चेतन भंडारी, सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सह सेक्रेटरी संजय डागा, खजिनदार किशोर ओसवाल, डायरेक्टर इन्चार्ज दिलीप जैन, कॉन्व्हेनर कुणाल ओस्तवाल आणि को कॉन्व्हेनर अमोल कुचेरिया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जीतोच्या वतीने करण्यात आले आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पतंप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार जितोच्या देशातील 68 आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील  21 चॅप्टरच्या माध्यमातून वर्षभरात 75 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यातील योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत पुण्यात होणारा कार्यक्रम आहे. या उपक्रमात केवळ तीन हजार लोकांना सहभागी होता येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी या लिंकवर जाऊन गुगल फॉर्म भरणे अनिवार्य आहे.

– कांतिलाल ओसवाल, उपाध्यक्ष, जितो ॲपक्स

आम्ही जितो स्पोर्टस्‌‍च्या माध्यमातून संपूर्ण देशभरात योगदिन साजरा करण्याचा निश्चय केला आहे. विविध उपक्रमांमधून योगदिवस साजरा केला जाणार असून योगगुरू रामदेव बाबा यांचे मार्गदर्शन पुणेकरांना लाभणार आहे. आरोग्याविषयी सजग असणे हे खेळाडू या नात्याने मी आवश्यक समजतो.*

  -विशाल चोरडिया, अध्यक्ष, जितो स्पोर्टस्‌‍ ॲपक्स

विश्व योगदिना निमित्त योगगुरू रामदेव बाबा पुणे शहरात येऊन मार्गदर्शन करणार आहेत ही पुणेकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. या उपक्रमांत जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवावा.

– राजेश सांकला, अध्यक्ष, जितो पुणे चॅप्टर

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *