आणि जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांना रडू कोसळलं…

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- आम्ही तुमची सिरीयल ‘आई माझी काळुबाई’ रोज बघतो…तुमच्या मध्ये आम्ही आमच्या कुलदेवतेला पाहतो…आम्ही इथून लवकर बाहेर पडून आमच्या कुटुंबीयांसमवेत राहावे अशी प्रार्थना आम्ही तुमच्याकडे काळुबाई म्हणूनच करतोय..  तुम्ही ती काळुबाई पर्यंत पोहोचवा …..असे एका भगिनीने सांगताच रडण्याचा अभिनय करणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल यांना खरोखरच रडू आले.  त्यांनी त्या भगिनीला जवळ घेतले तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सर्व भगीनींसाठी आणि त्यांच्या सुखी आयुष्यासाठी त्यांच्यासमोरच आई काळुबाईची प्रार्थना केली. याप्रसंगी महिलांसोबतच,खाकी वर्दीच्या वर्दीत असणारे अधिकाऱ्यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू तरळले. निमित्त होते येरवडा कारागृह प्रशासन ,भोई प्रतिष्ठान व आदर्श मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रेरणापथ उपक्रमांतर्गत अभिनेत्री अलका कुबल यांच्या स्नेहसंवादाचे.

याप्रसंगी  या अभिनेत्रीने आपल्यातला मोठेपणा बाजूला ठेवून एका मोठ्या बहिणीच्या नात्याने सर्व भगिनींशी संवाद साधला.

जिद्द, परिश्रम आणि कष्ट यावर विश्वास असेल तर तुम्ही सर्व संकटांना तोंड देऊ शकता. रागाच्या भरात नकळत एखादी चूक घडते आणि आपल्याला या ठिकाणी यावे लागते पण यावर मात करून तुम्ही पुढचा विषय ताठ मानाने आणि सन्मानाने जगा ,यासाठी तुम्हाला जी काय लागेल मदत लागेल ती भोई प्रतिष्ठानच्या माध्यमातून करायला मी तयार आहे .असे अलका कुबल यांनी सांगताच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. याप्रसंगी महिला बंद्यांनी महिलांनी भारुड, गीते ,तसेच माहेरची साडी या गाजलेल्या चित्रपटातील डायलॉग अलकाताई यांच्यासमोर सादर केले .यानिमित्ताने  अलका कुबल यांनी महिला कारागृहामध्ये सुरू असलेल्या विविध रोजगार प्रकल्पांची पाहणी केली. *सुधारणा व पुनर्वसन हे कारागृहाचे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरण्यासाठी  कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान यांच्यातर्फे केलेल्या सुरू असलेल्या प्रकल्पांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले .कारागृह उपमा निरीक्षक सौ स्वाती साठे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला

कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व व प्रेरणा पथ प्रकल्पाचे समन्वयक डॉ. मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाचे आयोजन मागची भूमिका स्पष्ट करताना कारागृहांमध्ये या महिलांना भावनिक व मानसिक आधार देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात असल्याचे  प्रतिपादन केले.            याप्रसंगी महिला कारागृह अधीक्षक श्री अनिल खामकर,  उपअधीक्षक सौ.पल्लवी कदम ,तुरुंगाधिकारी तेजश्री पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *