मोहोळ यांचा निवडणूक अर्ज ही फक्त औपचारिकता : ४ जूनचा निकाल पुणेकरांच्या गर्दीने दाखवून दिला आहे- रूपाली चाकणकर

The result of June 4 has been shown by the crowd of Pune residents
The result of June 4 has been shown by the crowd of Pune residents

पुणे(प्रतिनिधि)-पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार  मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची उतराई म्हणून इतकं ऊन असतानाही पुणेकर त्यांच्या उमेदवारीच्या निमिताने आयोजित करण्यात आलेल्या रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता मोहोळ यांचा निवडणूक अर्ज ही फक्त औपचारिकता राहिली असून ४ जूनचा निकाल पुणेकरांच्या गर्दीने दाखवून दिला आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला प्रदेशाध्यक्षा (अजित पवार गट) व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.

महायुतीच्या वतीने आयोजिट पत्रकार परिषदेत रूपाली चाकणकर बोलत होत्या. मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणूक अर्ज भरताना पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती. जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शहरातील महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. त्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

अधिक वाचा  मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर देवले पुलाजवळ भिषण अपघातात एक जण ठार तर एक जखमी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. महायुतीकडून मोहोळांचा प्रचारही अगदी जोमाने सुरु आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गुरुवारी पुणेकरांनी मुरलीधर मोहोळांच्या शक्तीप्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद दिला. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला प्रदेशाध्यक्षा आणि महिला आयोगच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुरलीधर मोहोळ यांचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love