Ajit Pawar: आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडला सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या चिखलात लोटले असून, शहरात सत्तेची मस्ती आणि माज आल्याचा घणाघाती आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. शहराच्या जडणघडणीत आपण कधीही सत्तेचा उतमात होऊ दिला नाही, मात्र आता केवळ भ्रष्टाचार करून पैसे कमवण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याटीकाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
अजित पवार यांनी महानगरपालिकेच्या बोट ठेवत सांगितले की, २०१५-१६ मध्ये महापालिकेकडे ४,८४४ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या, त्या आता अवघ्या २,००० कोटींवर आल्या आहेत. तब्बल ८,००० कोटी रुपयांच्या ठेवी मोडून शहराला कर्जबाजारी करण्यात आले असून, एवढा पैसा खर्च होऊनही शहरात ठोस कामे दिसत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकट्या स्थापत्य आणि पाणीपुरवठा (Water Supply) विभागाचे दायित्व ४,००० कोटींच्या पुढे गेले असून अनावश्यक कामे रिंग करून काढली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
शहरातील भ्रष्टाचाराचे उदाहरण देताना पवारांनी ‘ई-क्लासरूम ‘ (E-Classroom) आणि ‘स्मार्ट सिटी’ (Smart City) प्रकल्पांचा उल्लेख केला. एका टीव्हीची मंजूर किंमत १.५ लाख रुपये असताना बाजारभाव केवळ ५५,००० रुपये आहे, म्हणजेच प्रत्येक टीव्हीमागे मोठी लूट झाली आहे. तसेच, स्मार्ट सिटी अंतर्गत केबल (Cable) टाकताना निविदेनुसार ५ फूट खोदणे बंधनकारक असताना केवळ गुढघ्यापर्यंत खोदाई करून कोट्यवधी रुपये लाटले गेले. विशेष म्हणजे, बिलांमधील बनवेगिरी लपवण्यासाठी चक्क लावून आकडे बदलल्याचे पुरावे पवारांनी यावेळी सादर केले.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर (Crime) आणि ‘खोदाई माफिया’वर ही त्यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. लँड आणि वाळू माफियांप्रमाणेच (Sand Mafia) आता शहरात खोदाई माफिया सक्रिय झाले असून, परवानगीविना रस्ते उखडून जनतेच्या कराचा (Tax) पैसा वाया घालवला जात आहे. भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीच्या नावाखाली ७१ लाख रुपये लाटले गेले, तरीही शहरात २० हजार लोकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या आहेत, यावरून या भ्रष्टाचाराची व्याप्ती लक्षात येते, असे ते म्हणाले.
धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यांवरूनही पवारांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. आळंदी माऊलीच्या परिसरात कत्तलखाना प्रस्तावित करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यामागील जागेवर पोलीस स्टेशनचे आरक्षण (Reservation) टाकणे हे केवळ समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत, असे त्यांनी नमूद केले. शहराचे व्हिजन (Vision) हरवले असून रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली हजारो कुटुंबे उध्वस्त केली जात आहेत आणि बिल्डरांच्या (Builders) जमिनी मोकळ्या केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी ‘घड्याळ’ (Clock )आणि ‘तुतारी’ (Trumpet ) या युतीचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले. “मी जे बोलतो ते करतो,” असे सांगत त्यांनी सत्तेत आल्यास शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचे आणि शहर गुन्हेगारीमुक्त करण्याचे आश्वासन दिले. ही निवडणूक भ्रष्टाचारी राक्षसाचे दहन करण्यासाठी असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनी कोणाही दबावाला बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन केले.
















