सरकार कधी आणि कसं पडणार हे अजित पवारांना नीट माहिती आहे -चंद्रकांत पाटील


पुणे- पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि  भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप –प्रत्यारोपाच्या फैरी झाडणं सुरु आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील जाहीर सभेत “सरकार कधी बदलायचे हे माझ्यावर सोडा”, असे वक्तव्य करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर  राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपचे नेते यांच्यामध्ये जुंपली आहे. अजित पवार यांनी,”सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, सरकार पाडणे येड्या गबाळ्याचे काम नाही”, असा समाचार घेतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे.

तुम्हाला पण आणि आम्हाला पण एवढा अहंकार चांगला नाही. कालचक्र सुरु असते. तुमची १५ वर्षे सत्ता होती. त्यानंतर आमची ५ वर्षे सत्ता होती. आता तुम्ही पुन्हा सत्तेवर आला आहात. परंतु, कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधी जाणार, कसं जाणार हे त्यांना(अजित पवार) नीट माहिती आहे”, Ajit Pawar knows exactly when and how the government will fall अशा शब्दांत अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. “कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठीची त्यांची ही धडपड, फडफड आहे, दिवा विझताना जास्त मोठा होतो”, असे सूचक विधानही पाटील यांनी केले. त्यामुळे फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची विधाने हे या निवडणुकीपुरतीच आहेत की खरंच राज्यात सत्तापालट होणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  असं असणार शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ : काय आहे भाजपचा नवा फॉर्म्युला?