अदाणीचे वीज दर निवासी आणि सर्व व्यावसायिक-औद्योगिक ग्राहकांसाठी स्पर्धात्मकच


पुणे – मुंबईतील प्राथमिक वीज सेवा प्रदाता कंपनी म्हणून अदाणी इलेक्ट्रिसिटीचे ३१ लाखांहून अधिक घरे आणि आस्थापनांच्या ग्राहकांना विश्वासार्ह, परवडणा-या दरातील आणि शाश्वत वीज पुरवठा करण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट राहिले आहे.

आयात कोळसा आणि वायुच्या किमती याबाबतच्या अस्थिरतेमुळे निमित्त ठरलेल्या देशभरातील दरवाढीमुळे निर्माण झालेली आव्हाने कायम असूनही आमच्याकडून होत असलेली दरवाढ ही संपूर्ण महाराष्ट्रात तुलनेत सर्वात कमी असल्याचा दावा अदाणी इलेक्ट्रिसिटीने केला आहे.

नियामकाने जारी केलेल्या वीज दरांचे आम्ही स्वागत करतो. आमच्या ग्राहकांसाठी दीर्घकाळापासून असलेली वचनबद्धता साध्य करण्यासाठी आमच्या अथक प्रयत्नांना हे वीज दर प्रोत्साहन देतात; आमच्या ग्राहकांना सर्वात विश्वासार्ह, परवडणा-या दरात तसेच शाश्वत वीज पुरवठ्यासह सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अदाणी इलेक्ट्रिसिटीचे दर हे उपनगरीय मुंबईतील बहुतांश दर श्रेणीमध्ये सर्वाधिक स्पर्धात्मक असे आहेत. याद्वारे ग्राहकांची लक्षणीय बचत होते, असे याबाबत अदाणी इलेक्ट्रिसिटीचे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प पटेल यांनी सांगितले.

अधिक वाचा  अरविंद एज्युकेशन सोसायटीतर्फे नवरात्रोत्सवात भोंडला, थुंकीमुक्त रस्ता अभियान,पर्यावरण जनजागृती 

वर्ष २०२७ पर्यंत अक्षय ऊर्जा पुरवठा स्रोत ६० टक्क्यापर्यंत वाढवण्याचा दीर्घकालीन दृष्टीकोन आणि धोरण अंमलबजावणीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमच्या वीज पुरवठ्यापैकी ३० टक्क्यापर्यंत वीज पुरवठा हा संकरित अशा सौर + पवन स्त्रोतांकडून होत आहे. दोन वर्षांपूर्वी हे प्रमाण अवघे ३ टक्के  होते. इंधनाच्या किमतीतील तफावतांपासून आमचे ग्राहक यापूर्वीपासूनच सुरक्षित राहिले आहेत. नवीकरणीय ऊर्जेला ६० टक्क्यापर्यंत विस्तारण्याच्या दिशेने आमचे पाऊल हे केवळ कार्बन फूटप्रिंटच कमी करणार नाही तर आमच्या ग्राहकांना वीजेबाबतची दीर्घकालीन दर स्थिरता आणि दीर्घकालीन दृश्यमानतादेखील ते प्रदान करेल.

मुंबई शहरातील आघाडीची प्राथमिक वीज सेवा प्रदाता कंपनी म्हणून, आमच्या याबाबतच्या भूमिकेची आम्हाला जाणीव असून आमच्या औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना सर्वात स्पर्धात्मक दरात अविरत वीज पुरवठा करण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यामुळे कंपनीच्या ग्राहकांची उत्पादकता वाढून उत्पादन निर्यात अधिक स्पर्धात्मक होते. परिणामी राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत त्याद्वारे मोठे योगदान दिले जाते. त्याचरोबर निवासी ग्राहकांवरील किमान सुनिश्चित प्रभावामुळे विशिष्ट गटातील ग्राहकांना महागाईपोटी होणा-या वाढत्या खर्चापासून संरक्षणदेखील मिळते , असे अदाणी इलेक्ट्रिसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल शर्मा म्हणाले.

अधिक वाचा  तिहेरी तलाक या प्रथेविरुद्ध आयुष्य वेचणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद भाई यांचे निधन

अद्वितीय असे पे सेल्फ-हेल्प किओस्क, इलेक्ट्रा चॅटबॉट आणि व्हिडिओ कॉलिंग सेंटर यासारख्या आमच्या तंत्रस्नेही माध्यमांचा उपयोग करून ग्राहक-केंद्रित सेवा प्रदान करण्याबाबत अदाणी इलेक्ट्रिसिटी महत्त्वाची भूमिका बजाविते. आमची अत्याधुनिक एससीएडीए ही यंत्रणा सज्ज असून ती योग्यरित्या कार्यान्वितदेखील आहे. तर गृहनिर्माण संस्था आणि कार्यालय परिसरात आमचे स्मार्ट मीटरिंग आणि ईव्ही चार्जिंग रोलआउट हे वेगाने कार्यरत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love