‘शब्दांच्या अलीकडले’ या अनोख्या दिनदर्शिकेतून उलगडली शब्दांच्या जन्माची गोष्ट


पुणे-  प्रत्येकाच्या शब्दभांडारात अगणित शब्दसंपदा असते मात्र, हे शब्द नेमके आले कोठून हे मात्र आपल्याला माहितीच नसते. हेच लक्षात घेत शब्दांच्या जन्माची गोष्ट उलगडणारी ‘शब्दांच्या अलीकडले’ ही अनोखी दिनदर्शिका पुण्याच्या तेजस गोखले यांनी केली आहे.     

मराठमोळ्या शब्दांनी नटलेल्या ह्या दिनदर्शिकेतून ढालगज, हापूस, रिकामटेकडा, जिलेबी यांसारख्या १२ शब्दांचा प्रवास उलगडेल असे सांगत तेजस गोखले म्हणाले, “मराठी भाषेतील अनेक शब्द नेमके कोठून आले याचीच माहिती आपल्याला नसते. ही माहिती व्हावी आणि शब्दांचा प्रवास सर्वांसमोर यावा या उद्देशाने आम्ही ही दिनदर्शिका बनविली आहे. यामध्ये मराठी महिने, मराठे आकडे, मराठी सण, चालू शके यांचा देशील समावेश करण्यात आला असून ही दिनदर्शिका एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ अशी आहे. या दिनदर्शिकेचे मुल्य हे रु २०० इतके असून https://khalbatta.com/ ह्या संकेतस्थळावरून ती ऑनलाईन देखील खरेदी करता येऊ शकते.     

अधिक वाचा  Sharad Mohol Murder Case: शरद मोहोळ खूनप्रकरणात टोळी प्रमुख विठठल महादेव शेलार याच्यासह १७ साथीदारांविरुद्ध  मोक्का कारवाई

तेजस गोखले यांचा ‘क्रिएटिव्ह स्प्ल़ॅश स्टुडिओ’ गेली १० वर्ष मिडीया अँड ॲनिमेशन या क्षेत्रात कार्यरत आहे. ‘खलबत्ता’ ह्या आपल्या नव्या उपक्रमाअंतर्गत अशा वैविध्यपूर्ण गोष्टी आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा व त्यांच्या टीमचा उद्देश आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love