एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात


जळगाव- माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात झाला. अमळनेर येथील कार्यक्रम उरकून जळगावकडे जाताना त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने खडसे यांच्यासह गाडीतील सर्वजन सुखरूप आहेत. खडसे यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

भाजपमधून खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर असताना त्यांच्या हस्ते अमळनेर येथील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांचे उद्घाटन तसेच एरंडोल पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला एकनाथ खडसे उपस्थित होते. हा कार्यक्रम उरकून ते जळगाव कडे जात असताना त्यांच्या गाडीचा टायर फुटून हा अपघात झाला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने पुढचा अनर्थ टळला.

अधिक वाचा  सुप्रिया सूळेंनी खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचा चेंडू ढकलला जयंत पाटलांकडे.. काय म्हणाल्या?

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love