बस प्रवासादरम्यान चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण


पुणे—बसमधून प्रवास करताना झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन एका महिलेले चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अहमदनगर ते सातारा या मार्गावरील बस प्रवासादरम्यान पुण्यातील हडपसर परिसरात हा प्रकार घडला असून याबाबत २३ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 फिर्यादी महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. आणि याच भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीने चार महिन्याचा बाळाला घेऊन घर सोडले होते. लोणी गावातील असलेली ही महिला नगरला गेली. त्यानंतर तिने नगर ते सातारा बसने प्रवास सुरू केला. त्याचवेळी एक महिला त्यांच्या शेजारी सीटवर येऊन बसली. काही वेळाने महिलेने फिर्यादी यांच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यांच्याशी ओळख वाढवून दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या.

अधिक वाचा  वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून पोलिसांनी 13 जणांना घेतले ताब्यात : संशयित मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाडसह तिघांना 9 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी

स्वारगेट बस स्थानकात उतरल्यानंतर या दोघीही हडपसर परिसरात आल्या. तेथील एका चायनीजच्या दुकानात दोघींनी जेवण केले. त्यानंतर आरोपी महिलेने बाळाला खाऊ आणण्याचा बहाण्याने फिर्यादी महिलेकडून स्वतःजवळ घेतले आणि ती तिथून गेली ती परत आलीच नाही. बराच वेळ झाल्यानंतर फिर्यादी महिलेने आजूबाजूच्या परिसरात त्या महिलेचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शोध सुरू केला. अद्याप तिचा शोध लागला नसून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love