सॉफ्टवेअर व्यावसायिकाकडे ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या तथाकथित पत्रकाराने घातली पोलिसांच्या अंगावर गाडी … पोलिसांनी केला गोळीबार .. पुढे काय घडले..?

आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड

पुणे-सॉफ्टवेअर व्यावसायिकाकडे ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या सोलापूरच्या तथाकथित पत्रकाराला पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न या खंडणी बहाद्दर पत्रकाराने केला. त्यामुळे प्रसंगावधान राखत पोलिसांनी खंडणीबहाद्दराच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, ती गोळी गाडीच्या पाठीमागच्या चाकावर लागली. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाटस टोल नाक्याच्या जवळ घडली.  याप्रकरणी महेश सौदागर हनमे (रा. सोलापूर) आणि त्याचा साथीदार दिनेश हनमे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील खराडी येथील इ ऑन आयटी पार्कमधील सॉफ्टवेअर व्यावसायिकाकडे ऑगस्ट २०२२ पासून आरोपी ५ कोटींची खंडणी मागत होते. व्यावसायिकाने आतापर्यंत ३ लाख ८० हजार रुपये आरोपींना दिले आहेत. हनमे याच्याकडून वेळोवेळी पैशाची मागणी होत होती. महेश सौदागर हनमे हा स्वतः पत्रकार असल्याचे सांगत होता. त्याने फिर्यादीची बदनामी करण्याच्या उद्देशाने वगेवगळ्या खोट्या बातम्या तयार करून त्या बातम्याव्हॉट्सअ‍ॅपवर विविध लोकांना पाठवून पोलिस केस करण्याची धमकी दिली होती.

अधिक वाचा  #Teacher Recruitment : शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त लागला : अवघ्या काही तासात सुमारे अडीच हजार उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले

दरम्यान, आज महेश हनमेने व्यावसायिकास कुठल्याही परिस्थिती ५० लाख रूपये हवे आहेत अशी धमकी दिली होती. त्यासाठी त्याने त्यांना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील हॉटेल स्वराज येथे बो लावले होते. व्यावसायिकाने याबाबतची माहिती गुन्हे शाखेतीलवरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना दिली होती.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांतचव्हाण आणि इतर पोलिस अंमलदार हे आरोपींच्या मागावर आज (गुरूवार) मोहोळकडे रवाना झाले.

पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल आरोपींना लागली. पाटस टोल नाक्याजवळ पोलिस गेले असता तेथे आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत आरोपींवर गोळीबार केला. गोळ्या गाडीच्या पाठीमागील टायरवर लागल्या आहेत. पोलिसांनी पाठलाग करून महेश सौदागर हनमे आणि दिनेश हनमे यांना ताब्यात घेतले आहे.या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love