केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

राष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:च याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. त्यांना उपचारासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहा यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की,  ‘कोरोनाची सुरुवातीची लक्षणे पाहून, माझी चाचणी घेण्यात आली आणि रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. माझी प्रकृती ठीक आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले जात आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, गेल्या काही दिवसात माझ्याशी संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:चे विलगीकरण  (आयसोलेट) करून प्रत्येकाने आपली तपासणी करून घ्यावी.  

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टरांचे एक पथक गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी भेट देणार आहेत वृत्तसंस्थेच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.

मेदांता रुग्णालयात डॉक्टर सुशील कटारिया यांच्या देखरेखीखाली अमित शहा यांच्यावर उपचार सुरू आहेत. अमित शहा संध्याकाळी 4: 10 वाजता मेदांता रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टर सुशीला कटारिया यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गृहमंत्री शहा यांचे 4310 क्रमांकाच्या खोलीमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे.   

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लवकरच बरी होण्याची केली इच्छा व्यक्त  

केंद्रीय गृहमंत्री कोरोना सकारात्मक झाल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शहा यांना लवकरात लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना केली आहे.  त्यांनी ट्विट केले की, ‘अमितजी, तुमची चिकाटी व इच्छाशक्ती प्रत्येक आव्हानासमोर एक उदाहरण आहे. कोरोना व्हायरसच्या या मोठ्या आव्हानावर तुम्ही नक्कीच विजय प्राप्त कराल, असा माझा विश्वास आहे. तुम्ही शक्य तितक्या लवकर बरे व्हावे हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे.

 जेपी नड्डा यांनीही केली लवकर बरे वाटण्यासाठी प्रार्थना

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या त्वरित बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, ‘माननीय गृहमंत्री श्री. अमित शहाजी यांना कोरोना संसर्ग झाल्याची बातमी आहे. त्याच्या लवकर आरोग्य मिळावे म्हणून मी देवाला प्रार्थना करतो. ‘

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *