Five and a half lakh Congress guarantee card will reach the house

भाजपच्या संकल्प पत्रात घोर निराशेचे दर्शन – मोहन जोशी

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे–देशातील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने त्यांचे संकल्प पत्र पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकाशित केले. यामध्ये घोर निराशेचे दर्शन दिसून आले. तसेच सर्वसामान्य गरीब जनतेची आर्थिक सामाजिक परिस्थिती बदलेल यासाठी काहीही ठोस उपाय योजना नाही. या संकल्प पत्रात देशातील मुठभर उद्योग पती व श्रीमंत यांनाच संकल्प पत्रामुळे फायदा होणार आहे अशी टीका माजी आमदार व लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी यांनी आज केली.

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे संकल्प पत्र प्रकाशित केले यामुळे आंबेडकरी विचारांच्या नागरिकांची मते भाजपाला मिळतील अशी बेगडी  अपेक्षा त्यात दिसून येते. या संकल्प पत्रात गरिबांच्या उन्नतीसाठी काहीच नाही. अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन प्रमाणे देशातील दक्षिण उत्तर व पूर्व भारतातही बुलेट ट्रेन, एव्हिएशन म्हणजे हवाई वाहतुकीवर भर, सॅटेलाईट शरांची निर्मिती अशा खर्चिक व दिखाऊ उपक्रमांमुळे जनतेच्या पैशाची नासाडी तर होईलच आणि केवळ धनिक वर्गाचेच हित यातून साधले जाईल असे मोहन जोशी यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *