एमआयटी एडीटी विद्यापीठात विवेकानंद अध्यासन केंद्राची स्थापना

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे: एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, राजबाग, लोणी काळभोर येथे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर संशोधन, अध्यापन आणि तात्विक अभ्यास करण्यासाठी त्यांच्या नावाने विवेकानंद अध्यासन केंद्राची स्थापना करण्यात आली.

 या केंद्राचे उद्घाटन अखिल भारतीय विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचे अध्यक्ष श्री. बालकृष्णन, रामकृष्ण मठ, पुणे येथील स्वामी श्रीकांतनंदा, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ कराड आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते विश्वराज फिल्म स्टुडिओ येथे करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे विवेकानंद केंद्र महाराष्ट्र प्रांत चे अभय भट, किरण कीर्तने, कार्यक्रमाचे समन्वय डॉ. अतुल पाटील, डॉ. ज्ञानदेव निलवर्ण, डॉ. रमाकांत कपले यांच्या डीन, डायरेक्टर इतर अन्य मान्यवर उपस्थित होते.

ए. बालकृष्णन म्हणाले, की “स्वामी विवेकानंद अध्यासनाचे केंद्राची सुरुवात एमआयटी एडीटी विद्यापीठात होत आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. हे केंद्र प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रेरणा, ऊर्जा आणि शक्ती प्रदान करले.  या केंद्रात किमान पाच विद्यार्थ्यांनी भविष्यात विवेकानंदाचे विचार प्रसारित करण्यासाठी आमच्यासोबत जोडले जावे. देशाप्रती प्रेम आणि समर्पणाने भरून जाण्याचे विचार प्रसारित करतील. केंद्राच्या माध्यमातून ”मॅन मेकिंग एंड नेशन बिल्डिंग”चे कार्य व्हावे.

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, “माझी इच्छा आहे की एमआयटी एडीटी विद्यापीठामधील स्वामीजींच्या नावाने सुरू करण्यात आलेली हे अध्यासन केंद्र सर्वांना संशोधन, अध्यासन आणि अभ्यासासाठी प्रेरित करेल. आता विद्यापीठाची जबाबदारी आहे, की या केंद्राच्या माध्यमातून प्रत्येकांमध्ये देश निर्माणासाठी कार्य केले पाहिजे, जे स्वामी विवेकानंदांना प्रत्येक व्यक्तीमध्ये पहायचे होते. स्वामीजींच्या तत्त्वज्ञानाच्या केंद्रस्थानी असलेली करुणा ही शिकवली पाहिजे.”

प्रा.डॉ. मंगेश कराड म्हणाले, स्वामी विवेकानंद यांच्या सर्वात महत्त्वाचा संदेश हा आहे की तो “आपल्याला एकतेचा दृष्टीकोन ठेवण्यास प्रवृत्त करतो, जो त्यांच्या तत्त्वज्ञानाचा पाया होता. तरुणांनी देशाच्या विकासाचे आणि दूरदृष्टीचे नेतृत्व केले पाहिजे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही महत्वाची मुल्य विद्यार्थ्यांनी जोपासावी. या केंद्राच्या माध्यमातून मुल्यात्मक शिक्षण प्रदान करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि विवेकानंद अध्यसन केंद्र कन्याकुमारी यांच्या सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी स्वामी श्रीकांतनंदा यांनी आपले विचार व्यक्त केले.

प्रा. डॉ. अतुल पाटील यांनी प्रस्तावना केली. प्रा. स्नेहा वाघटकर आणि प्रा. स्वप्निल सिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ज्ञानदेव निलवर्ण यांनी आभार व्यक्त केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *