पुणे- मागच्या वेळी पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला त्यावेळी मृत पावलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर काही ठराविक स्मशानभूमितच अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यामुळे अनेकदा या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी रांग लागायची. त्यामुळे अनेकदा दुसऱ्या मृत रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसत. त्यावेळी पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोर यांच्या जवळच्या नतेवाईकाचा कोरोना मृत्यू झाला. नगरेसेवक असताना आणि अनेक प्रयत्न करूनही तब्बल चार तासांनी त्यांना रुग्णवाहिका मिळाली त्यानंतर स्मशानभूमीतही त्यांना अंत्यसंस्कारसाठी वाट पहावी लागली. त्यामुळे संतापलेल्या मोरे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांना वैद्यकीय सुविधा आणि रुग्णवाहिका पुरवता येत नसतील तर त्यांनाही चांगल्या गड्यांमधून फिरण्याचा अधिकार नाही असे म्हणत महापालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. पुणे शहरात कोरोनाने मागील वेळेपेक्षाही सध्या रौद्र रूप धारण केले आहे. रुग्णांची रोजची वाढती संख्या इतकी वाढली आहे की, रुग्णांना उपचारासाठी खाटा मिळणे दुरापास्त झाले आहे. ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटरची कमतरता यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी एका खाटेवर दोन रुग्ण तर काही ठिकाणी रुग्ण जमिनीवर सतरंजी टाकून उपचार घेत आहेत.
अशावेळी मागीळवेळी संतापलेल्या मनसेचे नगरसेवक वसंत मोर यांनी आपल्या विधायक कामातून सर्व नगरसेवकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. मोरे यांनी केवळ पाच दिवसांत पुण्यातील साई स्नेह हॉस्पिटलच्या सहाय्याने एका हॉटेलच्या हॉलमध्ये 40 ऑक्सीजनयुक्त खाटा आणि 40 होम आयसोलेशन साठी खाटांची सुविधा असलेलं हॉस्पिटल कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी उभी केली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
पाच दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलमध्ये 40 बेड ऑक्सीजन आ 40 बेड होम आयसोलेशन हॉस्पिटल चालू करू शकतो तर मग पुणे महापालिकेच्या 168 नगरसेवकांनी प्रत्येकी 10 बेड केले तर आज संपूर्ण शहरात 1680 बेड तयार झाले असते , असे मोरे यांनी ट्वीट केले आहे.
व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा