याला दुर्दैवी योगायोग म्हणावा काय? – गोपाळदादा तिवारी : बाबा धिरेंद्र शास्त्री यांच्यावर कारवाईची मागणी

‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा

पुणे- महाराष्ट्राच्या मानबिन्दुंची, अस्मितेची व श्रध्दास्थाने असलेल्या संतांची व महापुरुषांची सतत अवहेलना करण्याचे प्रयत्न भाजपच्या सत्ताधिशांच्या नाकाखाली चालली आहेत. हा दुर्दैवी योगायोग म्हणावा काय?  असा सवाल करत संतांच्या चारीत्र्याची पुरेशी माहीती नसतांना, उत्तराखंडचे बाबा धिरेंद्र शास्त्री यांनी महाराष्ट्राचे श्रध्दास्थान जगदगुरू संत तुकाराम महाराजांविषयी चुकीची वक्तव्ये करून त्यांची प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न केल्या बद्दल त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.

संत तुकाराम महाराज यांचे पती-पत्नी प्रेम अलौकिक होते. त्यांचे पत्नी (जीजा बाई)चे महाराजांवर निस्सीम प्रेम होते व त्या सती सावित्री प्रमाणे पतिव्रता देखील होत्या. रोज भंडारा डोंगर धुंडाळून, तुकोबांना शोघुन त्यांना जेवू घातल्या शिवाय त्या स्वतः अन्नग्रहण करीत नसत ही वास्तवता आहे. तुकाराम महाराजांच्या संस्कारांमुळे त्या देखील पांडूरंगाची पुजा, भजन, किर्तन व कविता करू लागल्या होत्या व पुढे तर त्यांची साध्वी म्हणून ही ओळख झाली. जगदगुरू तुकाराम महाराज हे शुरत्वाचे व सैन्य शिपाईंचे गुरू होते.

अधिक वाचा  तर अडलं कुठं? - राज ठाकरे

”मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास..कठीण वज्रास भेदूं ऐसे..।

भले तरी देऊ कासेची लंगोटी…नाठाळाचे माथी हाणू काठी”..।।

ईश्वर निष्ठेचा भाव जोपासत मेणाहून मऊ होऊ, माणुसकी दया भाव देखील जोपासू परंतू नाठाळ समोर आल्यास कठोर होऊन त्याचे माथी प्रसंगी काठी मारण्याचे धैर्य बाळगू.. अशी शिकवण आपल्या अभंगातून देणारे संत तुकाराम महाराज कशाप्रकारे कोणाचा मार खातील? हा साधा प्रश्न प्रश्न आहे.

उलटपक्षी, “जीवनाचा व संसाराचा मतितार्थ समजण्यासाठी आपल्या ‘पत्नीस ऊद्देशुनच’ त्यांनी खासकरून आपल्या तुकाराम गाथेत देखील अभंग लिहीले”..

“सत्यदेवे माझा केला अंगीकार.. आणिक विचार नाही दूजा..।

होई बळकट घालूनिया कांस.. हाचि उपदेश तुज आता”..।।

ते

“पुर्णबोध स्त्रीभ्रतार संवाद..। घन्य जिहीं वाद आइकीला..।।

तुका म्हणे आहे पांडुरंग कथा.। तरेल तो चित्ता धरील कोणी”।।

अधिक वाचा  भारताने वर्ल्ड कप जिंकला तर अॅस्ट्रोटॉकच्या युजर्सना मिळणार 100 कोटी - 'अॅस्ट्रोटॉक'चे सीईओ पुनीत गुप्ता यांची घोषणा

…. पर्यंतच्या अभंगात वास्तविक त्यांनी पत्नीस ऊद्देशुन लिहीलेल्या अभंगात शेवटी असे देखील म्हंटले आहे की,

“आमच्या पती – पत्नी संवादाचा बोध घेतला.. तरी समस्त जनांचे जीवन साकार होईल” हे आपल्या अभंगातुन सांगितले..!

हीच त्यांची पत्नी व संसारा विषयी भावना व शिकवणुक होती. मात्र जगदगुरूंच्या या वास्तवतेच्या पुर्णपणे विरोधी भाष्य बाबा धिरेंद्र शास्त्री यांनी केले व एकप्रकारे आपल्या उपहासात्मक वैचारीकतेचे प्रदर्शन केले. विशेष म्हणजे याच धिरेंद्र शास्त्रींच्या डेऱ्यामध्ये भाजपचे वरीष्ठ नेते पंतप्रधान मोदी, शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्याचे समोर येत आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्राच्या मानबिन्दुंची, अस्मितेची व श्रध्दास्थाने असलेल्या संतांची व महापुरषांची सतत अवहेलना करण्याचे प्रयत्न भाजप च्या सत्ताधिशांच्या नाकाखाली चालली आहेत. हा दुर्दैवी योगायोग म्हणावा काय?  असा सवाल गोपाळदादा तिवारी यांनी उपस्थित केला आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love