संगमनेर येथे रिलायन्स रिटेलचा स्मार्ट बाजारचे पहिले स्टोअर सुरु

पुणे-मुंबई
Spread the love

संगमनेर : रिलायन्स रिटेलचे मोठ्या आकारातील सुपरमार्केट असलेल्या स्मार्ट बाजारने संगमनेर येथील सह्याद्री कॉलेज जवळ, पुणे-नाशिक महामार्गावर ऑरेंज कॉर्नर मध्ये आपले पहिले स्टोअर सुरु केले आहे. या स्टोअरमध्ये एकाच छताखाली विविध प्रकारचे उत्पादन उपलब्ध असून यात किराणा सामान, फळे आणि भाज्या, डेअरी उत्पादनांपासून किचनवेअर, होमवेअर, वस्त्र प्रावरणे, पादत्राणे, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे. त्यामुळे येथे एकाच ठिकाणी खरेदीचा अनुभव मिळतो. या स्टोअरच्या माध्यमातून स्मार्ट बाजार आता संगमनेरमध्ये पोहोचले आहे.

विस्तीर्ण अशा १७ हजार चौरस फुटांच्या शॉपिंगच्या जागेवर पसरलेल्या स्मार्ट बाजारची रचना ग्राहकांना अधिक बचत आणि खरेदीचा उत्तम अनुभव देण्यासाठी करण्यात आली आहे. यात ग्राहकांना एकाच छताखाली विविध प्रकारची उत्पादने मिळतील ज्यात किराणा सामानासारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून दुग्धजन्य पदार्थ, फळे व भाजीपाल, विशेष वस्तू आणि होमवेअर, किचनवेअर, वस्त्र प्रावरणे, पादत्राणे, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स अशा उपयोगी वस्तूंचा समावेश आहे. येथे एमआरपीवर ५ टक्के पर्यंत सवलत तसेच विशेष हंगामी ऑफरच्या माध्यमातून वर्षभर बचतीच्या अनेक संधी मिळतील.

या स्टोअरमध्ये प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि पेये, पर्सनल केअर, आरोग्यसेवा, स्वच्छता, फॅब्रिक, होमकेअर आणि आकर्षक ऑफरवर उपलब्ध होम डेकोर यांसारख्या श्रेणींमध्ये अनेक ब्रँड्स उपलब्ध आहेत. स्मार्ट बाजारमध्ये खरेदी करण्याचा विशेष फायदा हा आहे की मोठ्या खरेदीमुळे नेहमीच जास्त बचत होते. उदाहरणार्थ, १,४९९ रुपयांची किमान खरेदी करणाऱ्या ग्राहकाला फक्त ९ रुपये किलो दराने साखर मिळते. उत्तम माहिती असलेले कस्टमर असोसिएट्स, फंक्शनल डिझाइन आणि लेआउट आणि आकर्षक किमतीतील दर्जेदार उत्पादनांमुळे स्मार्ट बाजार ग्राहकांची मने जिंकत असून त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत आहे.

आपल्या विविध किराणा मालाच्या फॉर्मेटच्या माध्यमातून रिलायन्स रिटेल ग्राहकांच्या दैनंदिन गरजांपासून विशेष प्रसंगी सर्व प्रकारच्या किमतींमध्ये ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत आहे. स्मार्ट बाजारचे लक्ष ग्राहकावर जास्तीत जास्त केंद्रित असल्यामुळे, स्मार्ट बाजारमधील विस्तृत श्रेणींमुळे आणि प्रत्यक्ष जवळीक साधल्यामुळे  मोठ्या आकारातील सुपरमार्केट श्रेणीतील सर्वोत्कृष्ट खरेदीचा अनुभव ग्राहकांना मिळतो.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *