A case has been registered against MLA Ravindra Dhangekar : पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल

A case has been registered against MLA Ravindra Dhangekar
A case has been registered against MLA Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : पुणे महापालिकेचे(PMC) पाणीपुरवठा विभागाचे(Water Supply Department) प्रमुख नंदकिशोर जगताप(Nandakishor Jagtap)  यांना शिवीगाळ करून धमकावल्या प्रकरणी कॉँग्रेसचे आमदार(Congress MLA)  रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नंदकिशोर जगताप यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धंगेकर यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त(Republic Day) पुण्यातील(Pune) गोखलेनगर (Gokhale nagar)  भागात आशानगर(Ashanagar) परिसरात महापालिकेकडून बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले होते. काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट(Datta Bahirat) यांनी पाण्याची टाकी(Water Tank) बांधण्यासाठी पाठपुरावा केला होता. टाकीच्या उद्घाटनाचे श्रेय भारतीय जनता पक्षाच्या(BJP) नेत्यांनी घेतल्याचा आरोप करून धंगेकर यांच्यासह कार्यकर्ते तेथे जमले होते.

अधिक वाचा  अजित दादांनी मारले एका दगडात दोन पक्षी : पवार घराण्यात कोण जेष्ठ? आणि कोण त्यांच्याबरोबर? याबाबत सांगताना अजित दादांचे सूचक वक्तव्य..

धंगेकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी शिवीगाळ करून धमकावले होते. या घटनेची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली होती. धंगेकर यांनी महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी निषेध केला होता. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धंगेकर यांच्यावर टीका केली होती. जगताप यांनी फिर्याद दिल्यानंतर सोमवारी रात्री धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

भाजपच्या आदेशाने माझ्यावर खोटे कलम लावत गुन्हा दाखल करण्यात आला आहे- धंगेकर

दरम्यान, ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात मी सगळं समोर आणत  असल्याने माझ्यावर पोलीस कारवाई करत आहेत. माझ्याकडून जी शिवीगाळ झाली; तो कार्यकर्त्यांचा संताप आणि भावना होत्या. माझी वाढती लोकप्रियता आणि मी करत असणारे कामे बघून जाणूनबुजून माझ्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. भाजपच्या आदेशाने माझ्यावर खोटे कलम लावत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या ८  महिन्यापासून हे लोक मला अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप धंगेकर यांनी भाजपवर  केला.

अधिक वाचा  कोरोना ज्या प्रयोगशाळेतून बाहेर आला, त्या वुहानमधील प्रयोगशाळेचा मालक बिल गेट्स - मेधा पाटकर

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की,  काल माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या कर्मचारी संघाने माझ्या विरोधात निषेध सभा घेतली आहे. मुळात इथं सभा घेता येत नाही, अस एक पत्र जिल्हा आधिकारी यांनी यापूर्वीच काढलं आहे. या आवारात महाराजांचा पुतळा आहे, म्हणून तिथं कुठल्याही राजकीय पक्षाला तिथं कुठलेच राजकीय कार्यक्रम घेता येत नाहीत.  त्या जागेत कुठलीही सभा, कुठलाही मोर्चा आणि आंदोलन त्या ठिकाणी घेता येत नाहीत. काल जे निषेध आंदोलन झालं हे चुकीचं झाल आहे, बेकायदेशीर आहे.

महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

काल झालेली नियमबाह्य सभा होती. पाण्याच्या टाकीच उद्घाटन करण्यासाठी सगळ्या पक्षाच्या नेत्याने बोलवण्याचा ठराव झाला होता. तरी अधिकारी जगताप यांनी परवानगी न घेता कार्यक्रम घेतला होता. भाजप आमदार यांच्या दबावाखाली येऊन कार्यकम घेतला, तो कार्यक्रम भाजपमय होता. आता अधिकारी भाजपमय झाले आहेत असा आरोप धंगेकर यांनी केला.

अधिक वाचा  नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप : कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

मला मुद्दाम अडवण्यात आले. आमच्या नेत्यांना मारहाण केली आहे. आधिकारी भाजपचे हस्तक झाले आहेत. हा पोलिसांचं जुना प्लॅन आहे.  गुन्हा दाखल करून मला मुद्दाम जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आयुक्तांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली. वेळ पडली तर त्यांचीही तक्रार मुख्यमंत्री महोदयांकडे करणार असल्याचे धंगेकर म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love