पुणे- ईएसआयसी एससी एसटी एम्प्लॉईज अँड ऑफिसर्स असोसिएशन, पुणेच्या वतीने आयोजित भीमजयंती 2023 फेस्टिवलच्या अंतर्गत दिनांक 7 एप्रिल रोजी लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उदघाटन ईएसआयसी उप प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख उपसंचालक प्रभारी हेमंत कुमार पांडेय यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी श्रीमती पांडेय तथा श्रीमती खांदवे तसेच संघटनेचे पदाधिकारी वैभव दूधमल, मनीष आडे, मिरेंद्र भोसले इ.कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमात लहान मुलांनी गीत गायन, भाषण, नृत्य व विविध कलांचे सादरीकरण केले. या वेळी लहान मुलींच्या एका संचाने भीम गीत गायन तथा नृत्य सादर केले.या प्रसंगी बोलताना श्री पांडेय यांनी सांगितले की भीम जयंती 2023 फेस्टिवल अंतर्गत आयोजित लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. त्यांनी बाबासाहेबांचे राष्ट्राच्या उभारणी मधील कार्य अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. तसेच लहान मुलांनी बाबासाहेबांचे कार्य भाषण, गीत विविध कलांमधून सादर करणे ही खूप आनंददायक गोष्ट असल्याचे सांगितले. तसेच या भीम जयंती 2023 फेस्टिवल ला शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी श्रीमती पांडेय यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशासाठी आजही प्रासंगिक असल्याचे सांगून भीम जयंती उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वैभव दूधमल यांनी केले.