आदर्श लोकप्रतिनिधी दिवंगत बाळासाहेब साळुंके यांचे जीवन प्रेरक – विजय सांपला

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे – ज्या पुण्यभूमिवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ संस्थापक डॉ हेडगेवार यांची भेट झाली त्या पवित्र स्थळी भेट देण्याचा आनंद वाटतो. वंचित समाजाला अधिकाराचे स्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेमुळे मिळाले. आज मी स्वतः संघ संस्कारातून घडून माझ्यासारखा कामगार मनुष्य मंत्रीपदावर पोहोचला. आदर्श लोकप्रतिनिधी दिवंगत बाळासाहेब साळुंके  यांचे जीवन प्रेरक आहे त्याचा प्रसार व्हायला हवे.  त्यांचे चरित्र अनुवादाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचत आहे याचा मनापासून आनंद आहे असे मत अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय  सांपला यांनी व्यक्त केले.

सामाजिक समरसता मंच आणि दिल्ली येथील यश प्रकाशन यांच्या वतीने ‘हमारे साहब’ आणि ‘अवर साहेब’ या  2 पुस्तकांच्या प्रकाशन प्रसंगी विजय  सांपला बोलत होते. या पुस्तकाचा हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अनुवाद  दिल्ली येथील यश प्रकाशनने केला आहे. भावे हायस्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भावे हायस्कूल येथे    १२ मे १९३९  डॉ.बाबासाहेब  आंबेडकर आणि संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांची भेट झाली होती. त्याच  स्थळी कार्यक्रम होत असल्याचे नमूद करत त्यांनी डॉ. हेडगेवार आणि बाबासाहेब यांचे कार्य महान आहे. संघ कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघशिक्षावर्गात  आले आणि त्यांनी स्वयंसेवकांची  चौकशी केली, अनुसूचित जातीचे स्वयंसेवक त्यात  मोठ्या संख्येने होते हे त्यांनी पडताळून पाहिले हे पूर्वी ऐकले  आहे. परंतु बाबासाहेबांच्या  अनुयायांच्या पुस्तकात हा संदर्भ सापडला याचा आनंद होतो आहे. बाबासाहेबांनी आपल्याला सर्वांना वाघ व्हा, पराक्रमी बना, समाजाचे नेतृत्व करणारे बना असा संदेश दिला आहे त्याचे आपण अनुकरण करायला हवे. ज्या राज्यघटनेच्या आधारावर व्यवस्था निर्माण झाली तिथे आज  राष्ट्रीय अनुसूचित जाती  आयोगाच्या माध्यमातून  विविध प्रयत्न सुरु आहेत. असेही ते म्हणाले.

  यावेळी भदंत डॉ. राहुल बोधी यांनी  गौतम बुद्धांनी करुणा आणि मैत्रीचा संदेश जगभर पसरवला, त्याच संदेशाच्या प्रसाराचे काम सम्राट अशोकाने  केले आणि बोधिसत्त्व  डॉ.आंबेडकर यांनी मैत्र आणि करुणेचा संदेश देत मानवतेला  प्रतिष्ठा देण्याचे काम केले, साळुंखे यांचे काम आपण पुढे न्यायला हवे. असे मत व्यक्त केले. या पवित्र भारत भूमीत सर्वांच्या कल्याणाचा विचार होती हि आपली संस्कृती आहे.  ती  हजारो वर्षांपासून आहे. त्याला बळकटी देण्याचे काम अनेक महापुरुषांनी केले.  गौतम बुद्धांचा  जन्म आणि निर्वाणाचे दिवस एक आहेत तसेच बाळासाहेब साळुंखे यांचा सुद्धा जन्म आणि निर्वाण एकाच (१० सप्टेंबर )दिवशी आहे हे महात्म्याचे लक्षण आहे असेही ते म्हणाले.

  प्रा. सुधीर –गाडे  यांनी प्रास्ताविकात आदर्श लोकप्रतिनिधीचे  चरित्र राष्ट्रीय स्तरावर पोहोचत आहे. याचा आनंद होत आहे.खासदार राकेश  सिन्हा यांच्या विशेष प्रयत्नातून पुस्तकाला अनुदान मिळाले असून  आयसीएसएसआर संस्थेची  मदत लाभली आहे. दिल्ली येथील यश प्रकाशनने पुस्तक प्रकाशित केले असून राकेश सिन्हा यांची  दीर्घ प्रस्तावना आहे. वैश्विक स्तरावर समानता आणि समरसता या मूल्यांच्या संदर्भात  बाळासाहेब साळुंके  यांचे जीवनकार्य  आदर्श आहे, पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी  प्रयत्न करायला हवे.  असे मत त्यांनी त्यातून व्यक्त केले आहे.अशी माहिती दिली.

डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या सहवासातील व्यक्तीने पुस्तक लिहिणे याचे ऐतिहासिक मूल्य मोठे आहे. यावेळी साळुंके  कुटुंबीय आणि पुस्तकातील सहभागी लेखक  तसेच   राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे  सदस्य  दिलीप पारधी आणि दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष  काश्यप साळुंके उपस्थित होते. प्रा. विक्रम शिंदे यांनी  सूत्रसंचालन केले तर  डॉ. सुनील भंडगे यांनी आभार मानले.

कोण होते बाळासाहेब साळुंके?

शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या वतीने १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत खेड मतदार संघातून बाळासाहेब साळुंके लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते.

दिवंगत बाळासाहेब साळुंके (१०/०९/१९२०- १०/०९/१९६१) हे १९५७-१९६१ या काळात खासदार होते. भोर तालुक्यातील म्हसर येथे जन्मलेले बाळासाहेब शालेय वयापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते. विद्यार्थी  दशेपासूनच ते सामाजिक कार्यात सक्रिय होते. रात्र शाळा, पुणे नगरपालिकेतील कामगार संघटना, पुणे शहरातील असंघटित कामगारांची संघटना अशा विविध माध्यमातून ते कार्यरत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात भोर संस्थानच्या मंत्रिमंडळात शिक्षण आणि अन्य खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी महत्त्वाचे काम केले. भोर संस्थानातील गावे वाड्या, वस्त्या यामध्ये प्रसंगी पायी फिरून त्यांनी जनतेच्या समस्या समजून घेतल्या. आपल्या अधिकारात अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. प्रभावी जनसंपर्क, गोड वाणी या आधारे बाळासाहेबांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांमध्ये मित्रत्वाचे आदराचे स्थान निर्माण केले.  शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यात सहभागी असलेले बाळासाहेब स्वातंत्र्यानंतर खासदार झाले. संसदेमध्ये लष्करी विषयावर अभ्यासपूर्ण भाषण करून त्यांनी स्वतःची छाप उमटवली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या संसदीय मंडळाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी पक्षाची संघटना बळकट करण्यात अखिल भारतीय स्तरावर स्वतःचा सहभाग नोंदवला. प्रामाणिक वृत्ती, पारदर्शकता हे गुण अंगी असलेल्या बाळासाहेबांनी प्रसंगी पदरमोड करून जनतेचे प्रश्न सोडवण्याची खटपट केली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *