संविधान सन्मान दौडला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद : 50 देशातील युवकांनी नोंदवला सहभाग


पुणे- भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित संविधान सन्मान दौड मध्ये स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ,स्पर्धेला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला .सुरुवातील संविधान उदेशिकेचे उपस्थित समुदयाने सामूहिक वाचन करून सुरुवात केली .या स्पर्धेला 50 देशातील युवक सहभागी झाले होते .पुण्यासह राज्यातील नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला .

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती,पुणे डॉ,बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी अथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान दौड २०२२ चे आयोजनसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या प्रांगणात  करण्यात आले होते.या दौडमध्ये दहा किमी, पाच किमी, तीन किमी आणि दिव्यांगांसाठी दोन किलोमीटर व्हीलचेअर रेसचे आयोजन आयोजकांकडून करण्यात आले होते.पहाटे साडेपाच वाजता महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्यमंत्री ना.मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते दौडला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमुख डॉ.विजय खरे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर,पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख ,पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, माजी समाज कल्याण राज्यमंत्री अविनाश महातेकर ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे आदी उपस्थित होते तीन किलोमीटरच्या दौडमध्ये मुलांमध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक लक्ष अकॅडमीच्या प्रदीप माने, पुणे ॲथलेटिक्स क्लबचा पवन जाधव, माने स्पोर्ट्स अकॅडमी चा अनिल जाधव आणि तीन किलोमीटर मुलींमध्ये आदिती हरगुडे,वेदिका साळुंखे ,विशाखा शिंदे ,पाच किलोमीटर प्रकारात मुलांमध्ये धुळदेव घागरे ,माणिक वाघ ,भगीरथ पवार तर मुलींमध्ये प्राची राणे,प्रांजली करांडे, तनवी डोंबे ,दहा किलोमीटर प्रकारात मुलांमध्ये निरज यादव ,दयानंद चौधरी ,बाळू पुकळे तर मुलींमध्ये सपना चौधरी, सानिका नलावडे, ऋतुजा माळवदकर यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय अशी बक्षिसे मिळवली. दिव्यांगांच्या दोन किलोमीटर व्हीलचेअर रेस मध्ये खडकी दिव्यांग रिहाबिलिटेशन सेंटरचे दिव्यांग जवान सहभागी झाले होते.

अधिक वाचा  शिवसैनिकांच्या कचाट्यात तानाजी सावंतांऐवजी उदय सामंत कसे सापडले?

शुभारंभ प्रसंगी प्रस्तावनेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी “भारतीय संविधान म्हणजे भारतीय संघराज्याला मिळालेला अमूल्य ठेवा असून संविधान दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी”, असे आवाहन केले.या प्रसंगी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सवैधानिक मूल्यांचे जतन करणे काळाची गरज असून भारताला एकसंघ ठेवण्यामध्ये भारतीय संविधानाचा मोठा वाटा आहे असे प्रतिपादन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love