कायद्यानुसार शिवसेना उद्धव ठाकरेंचीच- एकनाथ खडसे


पुणे-पूर्वीप्रमाणे आजच्या काळात फुटीला मान्यता नाही. आताच्या कायद्यानुसार फुटून निघताना तुम्हाला कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागते. सध्या शिवसेना कुणाची यावरून वाद होत आहे. ज्या पक्षाचे रजिस्ट्रेशन निवडणूक आयोगाकडे आहे आणि ज्या पक्षाला निवडणूक आयोगाने चिन्ह दिलेले आहे, सेना त्यांची, असे कायदा सांगतो. या कायद्यानुसार उद्धव ठाकरे यांनाच संपूर्ण अधिकार आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

 यासंदर्भात बोलताना खडसे म्हणाले, मी ४० वर्षे राजकारणात आहे. मात्र, अशा पद्धतीचे राजकारण मी कधीही अनुभवले नव्हते. पूर्वीही पक्षांमध्ये फूट पडली. शरद पवारही वेगळे झाले होते. काँग्रेस फुटली. मात्र कायदा त्यावेळी वेगळा होता. फुटीला मान्यता होती. मात्र, आता त्याला मान्यता नाही. आताच्या कायद्यानुसार तुम्हाला कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागते. तसे झालेले दिसत नाही. शिंदे गट आम्ही सेनेतच असल्याचे सांगत आहे. मग असे असेल, तर त्यांनी उद्धव ठाकरेंचे आदेश मानले पाहिजेच, कायद्यानुसार हेच योग्य आहे. बंडखोर, फुटलेल्या आमदारांना पक्षांतर बंदी कायद्यापासून सूट हवी आहे. त्यांनी आज म्हटले, की आम्ही शिवसेनेपासून वेगळे झालो आहोत, तर ते आजच अपात्र ठरतात किंवा त्यांना भाजपा, मनसे, प्रहार अशा कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावेच लागेल. आता पक्षात विलीन व्हायच्या आधी, अपात्रता टाळायची असेल, तर त्यांना आम्ही शिवसेनेतच आहोत, असे सांगावे लागत आहे.

अधिक वाचा  #हिट अँड रन' प्रकरण : दोन डॉक्टरांसह शिपायाला पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी  

 इंदिरा गांधीच्या काळातही झाला होता वाद

इंदिरा गांधी यांच्या कालखंडात खरी काँग्रेस कुणाची असा वाद निर्माण झाला होता. हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला, त्यावेळी आयोगाने चिन्ह गोठवले होते आणि दोघांनाहि वेगळे चिन्ह दिले होते. तर ज्यांनी काँग्रेस स्थापन केली, त्यांचाच पक्ष, असा निर्णय त्यावेळी झाला होता. आजहि अशीच स्थिती आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे, असे खडसे यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love