प्रतिक्षा संपली : उद्या दहावीचा निकाल : असा पहा निकाल


पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार १७ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल.

राज्यातून एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका कधी मिळणार ते निकालादिवशी कळविण्यात येणार आहे.

पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल –

अधिक वाचा  समलैगिकता ही विकृती : ८४ डॉक्टर्सचा सर्वेक्षणात सूर

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकर व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत किंवा शाळांमार्फत अर्ज करायचा आहे. गुणपडताळणीसाठी सोमवार २० जून ते बुधवार २९ जून पर्यंत अर्ज करायचा आहे. छायाप्रतीसाठी सोमवार २० जून ते शनिवार ९ जुलै पर्यंत अर्ज करायचा आहे. शुल्कही ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love