#खळबळजनक: ‘हॉरर’ चित्रपट पाहून आठ वर्षाच्या मुलाने बाहुलीला फाशी देऊन स्वत: घेतला गळफास


पुणे— पुण्याजवळील थेरगाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आठ वर्षाच्या मुलाने ‘हॉरर’ चित्रपट पाहून राहत्या घरात स्वतःगळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे या मुलाने खेळत असताना बाहुलीला पहिली फाशी दिली आणि नंतर स्वतः फाशी घेतली. ही घटना रविवारी (दि. २९ ) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.

आई घरातील कामात व्यस्त असताना आठ वर्षांचा चिमुरडा ‘कमल’ बाहुलीशी खेळत होता. दरम्यान, त्याने खेळत असताना आपल्या बाहुलीला फाशी दिली. एखाद्या कैद्याला फाशी देण्यापूर्वी चेहरा झाकतात अगदी तसाच त्याने बाहुलीच्या तोंडावर कपडा बांधला होता. बाहुली आपल्याला सोडून गेल्याचा समज झाल्यानंतर कमलनेदेखील स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून गळफास घेतला. कमलला मोबाईलवर ‘हॉरर’ फिल्म पाहण्याची सवय होती. त्यामुळेच त्याच्याकडून असे कृत्य झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

अधिक वाचा  #Nasiruddin Shah: राजकीय नेत्यांऐवजी रंगकर्मींच्या नावाने थिएटर का नाही?-ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचा सवाल

कमल खेम साऊद (वय 8, रा. सोळानंबर बस स्टॉप, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या चिमुरड्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास कमल आपल्या बाहुलीशी खेळत होता. त्यावेळी जवळच त्याचा लहान भाऊ आणि बहिणदेखील खेळत होती. त्यावेळी कमलची आई कामात व्यस्त होती. तर, वडील बाहेर गेले होते.

दरम्यान, खेळत असताना कमलने अचानक बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून तिला फाशी दिली. बाहुली मृत पावल्याचा समज झाल्यानंतर कमलने खिडकीला बांधलेल्या दोरीने स्वतःही गळफास घेतला. काही वेळानंतर कमलच्या आईने खोलीत येऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता कमल मोबाईलवर ‘हॉरर’ चित्रफीत पाहत असल्याचे समोर आले. त्यामुळे ‘हॉरर’ फिल्मचा एखादा सिन पाहूनच त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

अधिक वाचा  कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याची येरवडा कारागृहात आत्महत्या

मृत कमल दोन्ही मुलांपेक्षा वयाने मोठा आणि हुशार होता. आई कामात असताना तोच लहान भावंडाना सांभाळत होता. रविवारी दुपारी ज्यावेळी कमलच्या आईने खोलीत डोकावून पहिले तेव्हा बाहुलीचे तोंड बांधून तिला गळफास दिल्याचे तिला दिसले. तसेच, फासावर लटकलेले भीतीदायक चित्र नजरेस पडले. कमलला अशा अवस्थेत पाहून तिने जोरात हंबरडा फोडला. कमल अशी थट्टा करून नको. म्हणून आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला.मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love