बाबासाहेब पुरंदरे उभी करत असलेली शिवसृष्टी सार्वकालिक आहे- राज्यपाल कोश्यारी


पुणे -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला भेट देऊन शिवसृष्टीमध्ये उभारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची पाहणी केली. तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चाही केली.

आंबेगाव येथे शिवसृष्टीची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रा. अनिरुदध  देशपांडे, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम,आचार्य गोविंदगिरी महाराज आदी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जी शिवसृष्टी उभी करत आहेत ती सार्वकालिक आहे.  शिवाजी महाराजांचे योगदान अत्यंत महत्वाचे असून देशभरातून लोक शिवसृष्टी पाहायला येतील. त्यातून प्रेरणा मिळेल, शिवाजी महाराजांनी पराक्रम,शौर्य ,चातुर्य याच्या जोरावर नवीन किर्तीमान स्थापन केले. महाराष्ट्रात असणारे किल्ले प्रेरणास्त्रोत आहेत. असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.

अधिक वाचा  कोरोनामुक्त झाल्यावर त्याने केली गळफास घेऊन आत्महत्या ..

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम यांनी शिवसृष्टी प्रकल्पाबाबत माहिती दिली. तसेच यावेळी शिवसृष्टीची संपूर्ण चित्रफित दाखविण्यात आली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love