छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनी स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवास स्थानासमोर काढली भव्य रांगोळी


पुणे- अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात महाराष्ट्रभर साजरा झाला. राज्यभरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक ऐतिहासिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यामधील स्वर्गीय इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानासमोर 350 व्या राज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी काढण्यात आली होती.

पुण्यातील पर्वती विकास ट्रस्टच्या वतीने स्वर्गीय पुण्यभूषण श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानासमोर 350 शिवराज्याभिषेकदिनी छत्रपती शिवाजी महाराज यांची 18×12 रांगोळी काढण्यात आली होती. त्यासोबतच 350 दिव्यांचा दीपोत्सव पर्वती विकास ट्रस्ट यांच्या माध्यमातून पर्वती येथे संपन्न झाला.

यावेळी पर्वती विकास ट्रस्टचे अध्यक्ष मथुरेश राऊत आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे 'हिरो'- राज्यपाल कोश्यारी