सिरमच्या ‘कोवीशील्ड’ नावाला आक्षेप: सिरमला न्यायालयाने बजावली नोटीस


पुणे- मागील दहा महिन्यापासून देशभरात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाचे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची लस नेमकी केव्हा बाजारात येइल आणि आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी उत्सुकता सर्वांना लागली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिटयूट कोवीशील्ड’ ही लस लवकरच बाजारात सर्वसामान्यांकरिता उपलब्ध होईल अशी अपेक्षा असताना, सिरमने लसीकरिता वापरलेल्या ‘कोवीशील्ड’ नावावर आक्षेप घेण्यात आ\ला आहे. नांदेड येथील कुटीस बायोटेक कंपनीने याबाबत पुण्यातील न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने संबंधित तक्रार दाखल करुन घेत याबाबत सिरमला नोटीस बजावली आहे.

कुटीस बायोटेक कंपनीच्या संचालिका अर्चना आशिष काब्रा यांनी याप्रकरणी सिरम संस्थे विरोधात अॅड. आदित्य सोनी यांचे माध्यमातून पुणे न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कुटीस बायोटेक कंपनी हॅंड सॅनीटायझर, फ्रुटस अॅण्ड व्हेज शिंग लिक्विड, अॅंटीसेपटीक लिक्विड, सरफेस डीकन्टामेंट स्प्रे ही उत्पादने बाजारात ‘कोवीशिल्ड’ ब्रॅंडच्या नावाने विक्री करत आहे. ‘कोविशिल्ड ब्रॅंड नावाने त्यांनी 29 एप्रिल 2020 रोजी फार्मासक्युटिकल उत्पादने विक्रीसाठी अर्ज केला आणि 30 मे 2020 रोजी कोविशिल्ड ट्रेडमार्कने उत्पादने विक्री सुरु केली. परंतु सिरमने तीन जून 2020 रोजी कोवीशिल्ड नावाने लस बाजारात विक्रीसाठी पाठविण्याकरिता अर्ज केला असून अद्याप त्यांचे लसला परवानगी मिळू शकली नसल्याने ती बाजारात येऊ शकलेली नाही. सिरमच्या आधीपासून कोविशिल्ड नावाचा वापर आम्ही सुरु केला असून सिरमने त्यांचे लसीकरिता दुसरे नावाचा विचार करावा अशी मागणी कुटीस बायोटेक तर्फे न्यायालयात करण्यात आलेली आहे. संबंधित कुटीस बायोटेक कंपनी 2010 मध्ये रजिस्टर झालेली असून 2013 पासून फार्मासक्युटिकल उत्पादनांचा व्यवसाय करत आहे. सिरमने कोवीशील्ड हे आमचे उत्पादनाचे नाव वापरुन बाजारात त्यांची लस विक्री करु नये, त्यांनी त्यांचे लसीकरिता दुसरे नाव सुचवून ते वापरावे अशी मागणी न्यायालयात करण्यात आल्याचे अॅड.सोनी यांनी  सांगितले .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  ३५ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये महिलांच्या नृत्य स्पर्धा संपन्न !