कार्ल्सबर्ग इंडियाने व्यवसायाबरोबरच जपली सामाजिक बांधिलकी


पुणे-कार्ल्सबर्ग इंडिया’ने आपल्या व्यावसायिक भागीदारांना आणि ग्राहकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वास्थ्यासाठी १० लाख  सॅनिटायझिंग वाइपचे वितरण करण्याचा निर्णय घेत सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असल्यामुळे लोक आपल्या दैनंदिन व्यवहारांसाठी पुन्हा बाहेर पडू लागले आहेत. अशा वेळी सॅनिटायझेशन आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे. आरोग्यदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठीच्या सवयींना प्रोत्साहन मिळावे, म्हणून कार्ल्सबर्गने सॅनिटायझिंग वाइप खास तयार करून घेतले आहेत. आपल्या रिटेल विक्रेत्यांना पुरवून, खरेदीसाठी येणा-या प्रत्येक ग्राहकाला देण्याची सूचना दिली आहे. 

या वाइपमुळे कोव्हिड -१९ च्या विषाणूचा दुकानांत वस्तू विकत घेताना वस्तूंच्या हाताळणीत होणारा संसर्ग रोखता येईल आणि विक्रेता आणि ग्राहक दोघांच्याही मनात सुरक्षिततेची भावना वाढेल. कार्ल्सबर्ग इंडियाने आतापर्यंत महाराष्ट्रासह आठ राज्यांतील ४००० हुन जास्त आउटलेटमध्ये हे वाइप  उपलब्ध केले आहेत. 

अधिक वाचा  सिल्व्हर लेक करणार रिलायन्स रिटेलमध्ये 7 हजार 500 कोटींची गुंतवणूक

कार्ल्सबर्ग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मार्केटिंग व्हाइस प्रेसिडेंट पार्थ झा म्हणाले, आमचे ग्राहक आणि उपभोक्ते यांच्यावर आमचे लक्ष केंद्रित असते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही आमची साधने वापरणे, ही काळाची गरज आहे. या आमच्या उपक्रमातून त्यांना सुरक्षिततेची जाणीव करून देणे हा आमचा उद्देश आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love