तणावमुक्त मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियेसाठी ‘सुरक्षाकडी’ ॲप सादर

तणावमुक्त मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियेसाठी 'सुरक्षाकडी' ॲप सादर
तणावमुक्त मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियेसाठी 'सुरक्षाकडी' ॲप सादर

पुणे(प्रतिनिधि)–पुणेस्थित स्टार्टअप आणि लीगलटेक प्लॅटफॉर्म असलेल्या सुरक्षाकडी डिजिटल इस्टेट सर्व्हिसेस तर्फे तणाव मुक्त मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियेसाठी वापरण्यास सोपे असे सुरक्षाकडी ॲप सादर करण्यात आले आहे. ही माहिती सुरक्षाकडी डिजिटल इस्टेट सर्व्हिसेसचे सहसंस्थापक व सीएफओ योगेश अगरवाल आणि सहसंस्थापक व सीएमओ दीपक बन्सल यांनी दिली.

सुरक्षाकडीची स्थापना 2022 साली कंपनीचे संचालक व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सक्षम अगरवाल यांनी केली. कोविड महामारी दरम्यान त्यांच्या एका नातेवाईकाच्या निधनानंतर मालमत्ता हस्तांतरणाशी संबंधित निर्माण झालेल्या समस्या त्यांनी पाहिल्या होत्या. या वैयक्तिक अनुभवानंतर समाजात असलेल्या या आव्हानावर उपाय काढण्यासाठी कुटुंब आणि मित्रांकडून प्राथमिक निधी निर्माण केला आणि उत्पादन तयार करण्यास सुरूवात केली.

अधिक वाचा  ब्रिगेडीअरही अडकला सायबर चोरट्यांच्या जाळ्यात : फेक शेअर्स ट्रेडिंग मध्ये फसले अन बसला ३१ लाखांचा गंडा

या ॲपला कायदेशीर तज्ञ आणि संभाव्य वापरकर्त्यांद्वारे सकारात्मक अभिप्राय मिळाला असून उद्योग क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून देखील महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळाला आहे. अधिकाधिक कुटुंबांना त्यांच्या सुव्यवस्थित,पारदर्शक आणि किफायतशीर मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियांचा लाभ मिळावा आणि सुरक्षाकडीचा विस्तार करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

सुरक्षाकडी डिजिटल इस्टेट सर्व्हिसेसचे सहसंस्थापक व सीएफओ योगेश अगरवाल म्हणाले की, सुरक्षाकडी ॲप म्हणजे या सेवा क्षेत्रातील दरी भरून काढून मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया सोपे करण्यासाठी अखंड सेवांसह युझर फ्रेंडली प्लॅटफॉर्म निर्माण करण्याची आमची वचनबध्दता प्रतिबिंबित करते. खर्चिक पारंपारिक पध्दतीच्या विपरीत सुरक्षाकडी एक कार्यक्षम आणि किफायतशीर सेवा प्रदान करते. कायदेशीर वारसदारांना व्यापक प्रक्रिया आणि गुंतागुंतीपासून मुक्त करण्यास या सेवा ॲपच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध आहेत.

अधिक वाचा  कोरोना काळात जिओची दमदार कामगिरी:बीएसएनएलने गमावले 50000 ग्राहक

सुरक्षाकडी डिजिटल इस्टेट सर्व्हिसेसचे सहसंस्थापक व सीएमओ दीपक बन्सल म्हणाले की, छोटे व्यावसायिक,पगारी व्यक्तींसह समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी हे ॲप योग्य आहे. सध्या 6500 लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले असून यातील काही फीचर्स मोफत आहेत,मात्र जिथे गुंतागुंत आणि अधिक कागदपत्रांचा समावेश आहे,तिथे शुल्क आकारले जाईल.

प्रमुख वैशिष्टये :

 

  • ट्रान्सपरंट विल एक्झीक्युशन

 

  • मोफत ई – विल निर्माण प्रक्रिया

 

  • सुरक्षित डिजिटल केवायसी

 

  • फक्त कायदेशीर वारसदारांना उपलब्ध अशा ॲसेट वॉलेटसह युझर फ्रेंडली फीचर्स

 

  • ॲसेट वॉलेटसाठी अद्वितीय सुरक्षा

 

  • मालमत्ता व्यवस्थापन व नियोजन
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love