सोनालिका ट्रॅक्टर्सने ३३,२१९ ट्रॅक्टर्सची विक्री करत पहिल्या तिमाहीत नोंदवली 30.6 टक्क्यांनी वृद्धी


पुणे -देशाच्या काही भागांत आलेली कोव्हिड -१९ ची दुसरी लाट सौम्य होत असताना अर्थव्यवस्था पूर्ववत होण्याच्या वाटेवर आहे. मात्र,  अतिशय अवघड कोरोनाच्या  दुस-या लाटेतही शेतकरी वर्गाशी सतत संपर्कात राहण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत आधीचे सर्व विक्रम तोडून सोनालिकाने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक ३३,२१९ ट्रॅक्टरची विक्री करून कंपनीने ३०.६% वृद्धी नोंदविली आहे.

ट्रॅक्टर उद्योगाने २०२० च्या लॉकडाउन नंतर भारताच्या आर्थिक पुनरागमनाचे नेतृत्व केले. सोनालिका ट्रॅक्टर्स ने या वर्षभरात इतर ट्रॅक्टर उद्योगाच्या तुलनेत सातत्याने जास्त चांगली प्रगती केली.  २०२०-२१ मध्ये सर्वाधिक संख्येने नवी उत्पादने आणल्यानंतर २०२१-२२ मध्येही जास्तीतजास्त नवी उत्पादने बाजारात आणण्यास कंपनी सिद्ध आहे. सोनालिकाच्या नवे प्रगत ट्रॅक्टर्स मधे असलेल्या नव्या वैशिष्ट्यांमुळे ट्रॅक्टर उद्योगात एक नवा मापदंड तयार होईल आणि हे ट्रॅक्टर भारतात आणि जगभरात नव्या कृषि क्रांतीचे नेतृत्व करतील.

अधिक वाचा  निबे लिमिटेडने महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोमध्ये आत्मनिर्भर भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी एमएसएमई विकासाला दिले प्रोत्साहन

सोनालिका समूहाचे कार्यकारी  संचालक रमण मित्तल म्हणाले सोनालिका ट्रॅक्टर्स ने शेतक-याचे उत्पन्न वाढावे यासाठी प्रगत तंत्रज्ञान विकसित करणे आणि शेतीचे यांत्रिकीकरण याला प्राधान्य दिले आहे.  सोनालिका आपली जबाबदारी कधीच टाळत नाही आणि जेव्हा जेव्हा अवघड स्थिती आली तेव्हा कंपनीने  शेतक-यांच्या गरजाना प्राधान्य देऊन नवे उपाय योजत आव्हानांवर मात केली आहे. मी शेतक-यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी आमच्या हेवी ड्यूटी ट्रॅक्टर्स वर दृढ विश्वास दाखवला. सरकारने खरीप पिकांची  किमान आधारभूत किंमत  5 टक्क्यांपर्यंत वाढविली आहे.  मान्सून च्या अंदाजानुसार गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही  चांगला पाऊस पडेल आणि ट्रॅक्टर्स ना चांगली मागणी असेल.  आमचे शेतक-यांच्या गरजांनुसार तयार केलेले ट्रॅक्टर्स  एक नवा मापदंड तयार करतील आणि शेतीच्या  यांत्रिकीकरणाच्या आमच्या उद्दिष्टाकडे आम्ही वेगाने पोचू.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love