रिलायन्स रिटेलमध्ये सौदी अरेबियाची पीआयएफ 9,555 कोटींची गुंतवणूक करणार


मुंबई -मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेलमध्ये सौदी अरेबियाच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडने (PIF) रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेड (“आरआरव्हीएल”) मध्ये 2.04% इक्विटीसाठी 9,555 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची घोषणा केली. या रिलायन्स रिटेलच्या प्री-मनी इक्विटीचे मूल्य या करारात 4.587 लाख कोटी रुपये आहे. प्री-मनी इक्विटी मागील गुंतवणूकीपेक्षा सुमारे 30 हजार कोटी अधिक आहे.


रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूकीची प्रक्रिया 9 सप्टेंबरपासून सिल्व्हर लेकपासून सुरू झाली, त्यानंतर केकेआर, जनरल अँटालॅंटिक, मुबाडला, जीआयसी, टीपीजी आणि एडीआयए या जागतिक गुंतवणूक निधीची गुंतवणूक झाली आहे. पीआयएफ कराराव्यतिरिक्त, रिलायन्स रिटेलमध्ये 10% पेक्षा अधिक इक्विटीसाठी 9 गुंतवणूकीद्वारे आतापर्यंत 47,265 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे.

अधिक वाचा  रिलायन्सकडून नेटमेड्सची 620 कोटी रुपयांना खरेदी


रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सौद्यांबाबत आनंद व्यक्त करताना म्हटले आहे की, “सौदी अरेबियाबरोबर आमचे दीर्घकाळचे संबंध आहेत. पीआयएफ सौदी अरेबियाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. रिलायन्स रिटेलमधील मी एक महत्त्वाचा भागीदार म्हणून पीआयएफचे स्वागत करतो. आम्ही 130 कोटी भारतीयांचे आणि लाखो  लहान व्यापाऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी आणि रिटेल क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्याच्या महत्वाकांक्षी योजनेसाठी पीआयएफच्या सतत पाठिंब्याची अपेक्षा करतो”.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love