खडसे यांना आमदार करू नका – अंजली दमानियांची राज्यपालांकडे मागणी


मुंबई- राष्ट्रवादीमध्ये नुकताच प्रवेश केलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यातील वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीतर्फे राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून विधान परिषदेसाठी खडसे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा असतानाच अंजली दमानिया यांनी थेट राज्यपालांना पत्र दिले आहे. खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे असलेले आरोप आणि त्यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाच्यावेळी वापरलेली भाषा बघता त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करू नये अशी मागणी केली आहे. त्यामुळे खडसेंच्या राज्यपाल नियुक्त आमदार होण्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अंजली दमानिया यांच्यावरही टीका केली होती. दमानिया यांनी माझ्यावर विनय भंगाचा गुन्हा दाखल केला असे ते म्हणाले होते. दरम्यान, दमानिया यांनी खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत याप्रकरणी अकोला पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल केली आहे.

अधिक वाचा  एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत काय म्हणाले अजित पवार ?

आपण खडसे यांच्याबाबत शरद पवार यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, पवारांनी खडसे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असा दावा करत खडसे यांनी वृत्त वाहिन्यांशे बोलताना माझी बदनामी केली, असा आरोप दमानिया यांनी केला आहे. माझ्याकडील सर्व पुरावे राज्यपालांना दिले असून न्यायालयातही लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love