राज्य सरकारचा बचाव करण्याचे एकमेव काम शरद पवार करीत आहेत- देवेंद्र फडणवीस


पुणे —राज्य शासनाचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी सरकारचा बचाव करण्याचे एकमेव काम राष्ट्रवादीचे नेते शरद पवार करीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. केवळ टोलवाटोलवी करू नका अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्ट करावे असेही ते म्हणाले.

सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी बारामती तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. तुळजापूर येथे शरद पवार यांना मुख्यमंत्री घरातून का काम करतात असा प्रश्न केला   त्यावर एकाच ठिकाणी थांबुन काम करण्यासाठी आम्हीच त्यांना विनंती केल्याचे पवार यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर फडवणीस यांनी पत्रक़ारांशी बोलताना ज्येष्ठ नेते पवार यांना हा टोला लगावला.

अधिक वाचा  रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये -पंकजा मुंडे

फडणवीस म्हणाले, राज्याचा नाकर्तेपणा समोर येत आहे. आमचा दौरा घोषित झाल्यावर सगळे पालक मंत्री जनतेच्या भेटीला गेले.शेतकरी एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आहे. सरकारने प्रथम शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. तुमचे राज्यपालांसोबत जे काही मतभेद असतील ते चालत राहतील.  राज्यपालांबरोबर यापूवीर्ही मतभेद झालेत. त्यामुळे आता तो विषय नाही.  शेतकऱ्याला काय मदत मिळणार ,असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.  केंद्राची वाट न बघता राज्यानं मदत करावी,असा सल्ला देखील त्यांनी दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love