पुणे-लोणावळा लोकल सेवा सुरू:फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी


पुणे(प्रतिनिधि)— लॉकडाऊनमुळे बंद असलेली पुणे ते लोणावळा लोकल सेवा आज (सोमवारी) सुरू झाली. राज्य सरकारच्या निर्देशानुसार ही सेवा सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आली आहे.

पुण्याहून पहिली लोकल सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी रवाना होऊन लोणावळ्याला ९ वाजून ३० मिनिटांनी पोहोचली. तसेच लोणावळ्याहून सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी निघालेली लोकल सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी पुणे स्थानकात पोहोचली.  दुसरी लोकल पुण्याहून संध्याकाळी ६ वाजून २ मिनिटांनी सुटणार असून ती रात्री ७ वाजून २७ मिनिटांनी लोणावळा स्थानकात पोहोचेल. तसेच लोणावळ्याहून संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी लोकल पुण्यात रात्री ७ वाजता पोहोचणार आहे. या दोन्ही विशेष लोकल पुणे ते लोणावळा मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील. राज्य सरकारने या विशेष लोकल सेवेसाठी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी आणि ही प्रक्रिया पाहण्यासठी नोडल ऑफिसर म्हणून घोषित केले आहे. पुणे पोलिसांकडून देण्यात येणारी ही ओळखपत्रे क्यू आर कोडवर आधारित असतील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी हे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  दिलासादायक:आठ दिवसांपासून पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या होतेय कमी The number of corona patients in Pune has been declining for the last eight days