पुणे(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू व सहलेखक अनुपम त्रिवेदी लिखित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ @ १०० : एक शतक संकल्पाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे मुख्य प्रवक्ते, राज्यसभा सदस्य डॉ. सुधांशू त्रिवेदी आणि भारतीय जनता पार्टीचे महामंत्री, राज्यसभा सदस्य विनोद तावडे यांच्या हस्ते मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात होणार आहे.
स. प. महाविद्यालयाच्या आवारातील भाऊसाहेब चितळे सभागृह, ज्ञानमंडपम् येथे सायंकाळी ५:३० वाजता हा प्रकाशन सोहळा होणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात अनेक पुस्तके व साहित्य प्रकाशित झाले आहे. जे प्रसंग, घटना व इतिहास जनतेपर्यंत पोहोचले नाहीत अशा सर्व बाबींचा अंतर्भाव या पुस्तकात असल्याचे लेखक श्याम जाजू यांनी सांगितले. समाज जीवनाची स्थिती व संघाची तत्कालीन भूमिका या सर्वांचा संदर्भ व स्रोत देऊन परिपूर्ण स्वरूपात पुस्तक जनतेसमोर ठेवण्यात लेखक यशस्वी झाले आहेत, असे मत दिलीपराज प्रकाशनचे प्रमुख राजीव बर्वे यांनी व्यक्त केले.
मूळ इंग्रजी व हिंदी भाषेत असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रपती भवन येथे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्ण यांच्या हस्ते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाले आहे. त्या वेळी ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार रामबहादूर राय यांची प्रमुख उपस्थिती होती.















