राष्ट्रीय सुरक्षेच्या ‘चाणक्या’चा राजकीय ‘चाणक्या’च्या हस्ते गौरव – देवेंद्र फडणवीस ; अजित डोवाल यांना मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान


पुणे (प्रतिनिधी)-“राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना ‘चाणक्य’ मानले जाते, अशा अजित डोवाल यांना आज मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील ‘चाणक्य’ म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः उपस्थित राहिले आहेत. हा खऱ्या अर्थाने एका धुरंधराचा गौरव करण्यासाठी दुसऱ्या धुरंधराचा झालेला आगमनाचा दुग्धशर्करा योग आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कार्याचा  गौरव  केला.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार  अजित डोवाल यांना पुण्यात आयोजित एका भव्य सोहळ्यात लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा मानाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते  गौरविण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुनेत्रा पवारकेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीचंद्रकांत पाटील,  उद्योग  आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलपती डॉ. दिपाली टिळक यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अधिक वाचा  ...तर पद्मश्री परत करू : ‘समरसता संमेलना’त रघुवीर खेडेकर यांचा इशारा

अजित डोवाल यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना फडणवीस म्हणाले की, यापूर्वी हा पुरस्कार देशाच्या पंतप्रधानांपासून ते थोर शास्त्रज्ञांपर्यंत अनेक महनीय व्यक्तींना मिळाला आहे. मात्र, २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचे सुरक्षा धोरण  बदलण्यात डोवाल यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. त्यांनी ‘प्रोअॅक्टिव्ह डिटेरन्स’  ही नवीन रणनीती अमलात आणली. यामुळे आज भारत केवळ हल्ले सोसणारा देश राहिला नसून, शत्रूच्या घरात घुसून मारण्याची क्षमता असलेला आणि तशी कृती करणारा देश बनला आहे. डोवाल यांच्या विधानांचा संदर्भ देत फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ‘सिल्व्हर मेडल’ला जागा नसते; इथे एकतर तुम्ही जिंकून इतिहास घडवता किंवा हरलात तर स्वतः इतिहास जमा होता. अशा परखड विचारसरणीच्या आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा हा सन्मान होणे ही अभिमानाची गोष्ट आहे.

अधिक वाचा  इंटरसिटी स्मार्टबसकडून पुणे-नागपूर मार्गावर भारतातील पहिली प्युरीफाईड एअर बससेवा सुरू

लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रवादाची सांगड डोवाल यांच्या कार्याशी घालताना फडणवीस यांनी टिळकांना ‘भारतीय राष्ट्रवादाचे जनक’ म्हणून संबोधिले. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर जेव्हा देश हताश झाला होता आणि ब्रिटिशांच्या आशीर्वादानेच स्वातंत्र्य मिळेल अशी मानसिकता तयार झाली होती, तेव्हा टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ हा मंत्र देऊन भारतीयांच्या रक्तात नवीन स्फुरण भरले. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून जातीपातींत विभागलेल्या समाजाला एकत्र आणण्याचे आणि त्याद्वारे स्वातंत्र्याची चळवळ सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले. स्वातंत्र्य लढा हा केवळ राजकीय नसून तो सामाजिक अभिसरणाचा भाग असावा, असा टिळकांचा विचार होता. अशा महान राष्ट्रपुरुषाच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार डोवाल यांच्यासारख्या प्रखर राष्ट्रप्रेमी व्यक्तीला मिळणे हा खऱ्या अर्थाने सार्थ गौरव आहे. अजित डोवाल यांच्यातील विनम्रतेचा विशेष उल्लेख करत, फडणवीस यांनी त्यांच्या अफाट क्षमतेचे कौतुक केले.

अधिक वाचा  महाविकास आघाडीने एकत्रित काम केल्याचा आणि सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचा विजय -शरद पवार

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love