रसिकांपर्यंत संगीत पोहचण्यासाठी हल्लीच्या काळात काय करावे? शंकर महादेवन यांनी दिला मंत्र


पुणे : “हल्ली संगीत केवळ चित्रपटांद्वारे रसिकांपर्यंत पोहचू शकते असे नाही तर अनेक डिजिटल माध्यमे, समाज माध्यमे (SOCIAL MEDIA) उपलब्ध झाली आहेत. ज्यामुळे संगीतकार थेट आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे नवोदित संगीतकार, गायकांनी केवळ चित्रपटांवर अवलंबून न राहता या डिजिटल माध्यमांचाही (DIGITAL MEDIA) योग्य वापर करायला हवा,” असे मत प्रसिध्द गायक शंकर महादेवन (SHANKAR MAHADEVAN) यांनी व्यक्त केले.

फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या वतीने प्रसिद्ध गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्या एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. अनिता सणस यांच्या पुढाकारातून याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नॅटली शर्मा यांनी महादेवन यांच्याशी संवाद साधला. यावेळी फ्लोच्या सभासद सहभागी झाल्या होत्या.

अधिक वाचा  राज्यातील लोककलावंतांच्या महितीची सूची तयार करणार - राजेंद्र पाटील येड्रावकर

यावेळी महादेवन म्हणाले, “बदलत्या काळानुसार प्रसिद्धीची माध्यमेही बदलत आहेत. प्रत्येक माध्यमाचे फायदे जाणून घेत त्याचा योग्य तो वापर केला तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. इन्टरनेटमुळे एकीकडे सीडी, कॅसेटची विक्री कमी झाली आणि लोक ऑनलाईन संगीत डाऊनलोड करू घेऊ लागले हा तोटा असला तरी दुसरीकडे एवढे डिजिटल माध्यमे खुली झाली आहेत की, ज्याला हवे तो आपले संगीत थेट रसिकांपर्यंत पोहचवू शकतो. यामुळे संगीत कंपन्यांचे हातपाय पडण्याची गरज आज संगीतकारांना राहिलेली नाही. त्यांच्याशिवायही नवोदितांना आपले संगीत पोहचवता येते. त्यामुळे आपल्याला काय आवडते काय नाही हे सुद्धा रसिक स्वतः ठरवू शकतात.”

टाळेबंदीच्या काळाविषयी बोलताना ते म्हणाले, “हा काळ सगळ्यांसाठीच फार कठीण आहे. लहान संगीतकार, गायक ज्यांची उपजीविका ऑर्केस्ट्रा, लग्नसमारंभ यातील कार्यक्रमांवर अवलंबून होती त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही काही निधी जमा करत असून त्यातून त्यांना मदत करत आहोत.” “या कठीण काळात खचून न जातात याचा सदुपयोग करणे आवश्यक आहे. रोजच्या धकाधकीतून मिळालेली ही सक्तीची विश्रांती सर्जनात्मक कारणी लावायला हवी. शांत बसून विचारमंथन करणे, नवे काहीतरी करण्यासाठी नियोजन करणे अशा सत्कारणी लावायला हवा.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अधिक वाचा  आता सहनशीलतेचा अंत पाहू नका- सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा

महादेवन यांनी कर्नाटकी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले असून त्यांचे यावर विशेष प्रेमही आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, “कोणतीही भाषा बोलायची किंवा शिकायची असेल तर आधी त्याचे व्याकरण पक्के करावे लागते. मग त्या भाषेत अनेक फुलोरे आणता येतात. तसेच सर्व संगीत प्रकारांचे व्याकरण, पाया म्हणजे शास्त्रीय संगीत आहे. बॉलीवूडचे संगीत असो किंवा अन्य कोणताही प्रकार ही संगीताची केवळ एक शाखा आहे. शास्त्रीय संगीत हे एक विशाल सागर आहे.”

आपल्या संगीत आकादामिविषयी बोलताना ते म्हणाले, “ऑनलाई संगीत अकादमी ही संकल्पना १५ वर्षांपूर्वी अगदीच नवी होती. अशा प्रकारे संगीत शिकविण्यासाठी आम्हाला खूप अभ्यासही करावा लागला. सुरुवात १५ विद्यार्थ्यांपासून झाली. मात्र आज ९८ देशांमध्ये याचे काम चालते. यात अडीच वर्षांच्या मुलापासून ते ९२ वर्षांच्या आजोबांपर्यंत विद्यार्थी संगीत शिकत आहेत. २४ तास चालणारी ही एकमेव संगीत अकादमी आहे. शिवाय आम्ही स्वमग्न मुलांनाही संगीत शिकवतो. धारावी मधील हजार मुले या अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love