वसंत मोरे आता ठाकरे सेनेची मशाल हाती घेणार : वंचितलाही रामराम

वसंत मोरे आता ठाकरे सेनेची मशाल हाती घेणार
वसंत मोरे आता ठाकरे सेनेची मशाल हाती घेणार

पुणे(प्रतिनिधी)– लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हातात घेणाऱया वसंत मोरे यांनी आता ठाकरे सेनेत प्रवेश करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यादृष्टीने मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची गुरुवारी भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यातील समीकरणे बदलणार आहेत. मोरे ९ जुलैला मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार असून  

लोकसभा निवडणुकीत ठाकरेसेनेने चांगले यश मिळवित 9 जागा पटकावल्या. त्यामुळे ठाकरे सेनेकडे उमेदवारांचा कल वाढत असतानाच मूळ शिवसैनिकही पुन्हा बॅक टू पॅव्हेलियन येताना दिसत आहेत. वसंत मोरे हेही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक. कात्रजमधील आपल्या राजकारणाची सुरुवात त्यांनी शिवसेनेतूनच केली. कात्रजचे ते शाखाप्रमुख होते. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांनीही सेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षात ते सक्रिय झाले.

अधिक वाचा  अरे जाऊ दे.. कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत... कोणाला म्हणाले असे अजित पवार?

 मनसेच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मोरे यांनी बघता बघता पुणे शहर व परिसराच्या राजकारणावर आपला प्रभाव टाकला. २००७ च्या पुणे मनपा निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले. तर २०१२ च्या निवडणुकीत तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. यात मोरे यांचा वाटा मोलाचा होता. २०१२ ते १३ या कालावधीत पालिकेत विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी नेटाने जबाबदारी सांभाळली. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली. पण, त्यात ते अपयशी ठरले. २०१७ ला ते पुन्हा महापालिकेवर निवडून आले. तर २०२१ मध्ये त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

दरम्यानच्या काळात त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार करण्यात आले. मनसेच्या नव्या भूमिकेमुळे ते काहीसे नाराज होते. त्यावरून राज यांच्याशी त्यांचे मतभेदही झाले. तरीही पक्षात कायम राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. २०२४ मध्ये लोकसभा लढविण्यास ते इच्छुक होते. मात्र, पक्षाने लोकसभा निवडणुकीतून अंग काढून घेतल्यानंतर त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला व पुणे लोकसभा निवडणुकीत वंचितच्या माध्यमातून अर्ज दाखल केला. मात्र, लोकसभा निवडणुकीत मोरे यांना अपेक्षित मते घेता आली नाहीत. आता ठाकरेसेनेत प्रवेश करीत मोरे यांनी एक वर्तुळ पूर्ण केले आहे. 

अधिक वाचा  पुणे लोकसभेसाठी कॉँग्रेसकडून 20 जण इच्छुक : माजी मंत्री, विद्यमान; माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी ते शहराध्यक्षांचा समावेश

विधानसभेत हडपसर, कोथरूड, पर्वती या जागा ठाकरे सेनेच्या वाटय़ाला येऊ शकतात, असे बोलले जाते. खडकवासल्यावरही ठाकरे गट दावा करणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने हडपसर किंवा खडकवासल्यातून उमेदवारी मिळविण्याचा मोरे यांचा प्रयत्न असू शकतो. 

 हडपसर किंवा खडकवासल्यातून शड्डू ठोकण्याचा विचार 

वसंत मोरे म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी माझ्याकडे दोन पर्याय आहेत. खडकवासला किंवा हडपसर दोन्हीकडून मी लढू शकतो. पुणे शहरात माझे मतदान नव्हते. माझा तो भाग नव्हता. तरीही मला चांगली मते मिळाली. माझ्यावर पहिला गुन्हा सेनेत असतानाच दाखल झाला. मी बदलणार नाही. जनतेच्या हितासाठी काम करत राहीन. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love