झिकाचा प्रादुर्भाव रोखा : श्रीनाथ भिमालेंचे पालिका आयुक्तांना निवेदन

झिकाचा प्रादुर्भाव रोखा : श्रीनाथ भिमालेंचे पालिका आयुक्तांना निवेदन
झिकाचा प्रादुर्भाव रोखा : श्रीनाथ भिमालेंचे पालिका आयुक्तांना निवेदन

पुणे(प्रतिनिधी)- पुणे परिसरात झिकाचा सातवा रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका ५५  वषीय महिलेला झिका विषाणूची बाधा झाली असून, ऐन पावसाळय़ात झिकाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. २ जुलैपर्यत पुण्यात झिकाची सहा प्रकरणे नोंदवली गेली होती. त्यापैकी दोन रुग्ण गर्भवती महिला होत्या. त्यात आणखी एका रूग्णाची भर पडली आहे. आता पुण्यात झिकाच्या रूग्णांची संख्या सातपर्यंत पोहोचली आहे.

दरम्यान, झिकाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधीही पुढाकार घेताना दिसत आहेत. पुण्यातील पर्वती मतदारसंघात झिकाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक औषध फवारणी आणि जनजागृती करण्यासंदर्भात पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले आहे.

अधिक वाचा  रोणू मजुमदार यांच्या बासरीवरील 'जयजयवंती'ने घेतला रसिकांचा ठाव

भिमाले यांनी त्यांच्या निवेदानामध्ये, सध्या पुणे शहरात सर्वत्र झिका या रोगाचा संसर्ग सुरू झालेला आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेने याची दखल घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केलेल्या आहेतच परंतु पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये या झिका वायरसवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषध फवारणी व झिका बद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

तसेच पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये झिकाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक औषध फवारणी व जनजागृती करण्याबाबत संबंधित यंत्रणेला आपण सूचित करावे. तसेच महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिका या रोगाचा संसर्ग झाल्यानंतर करावयाच्या औषध उपचाराबाबत सर्व वैद्यकीय सुविधा व औषध उपचारासाठी आवश्यक त्या बाबींची देखील उपलब्धता असावी याबाबत आपण आरोग्य विभागास सूचना द्याव्यात, अशी विनंतीही भिमाले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love