विधानसभेला अजित पवार यांना शह देण्याच्या शरद पवार तयारीत? काढताय बारामती तालुका पिंजून

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एक होणार?
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एक होणार?

पुणे(प्रतिनिधि)–मागच्या आठवड्यात जेष्ठ नेते शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघाचा दौरा केल्यानंतर मंगळवारपासून पुन्हा तीन दिवस बारामती तालुक्याचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात ते संपूर्ण बारामती पिंजून काढणार असल्याचे बोलले जात आहे. अशाप्रकारे बारामती तालुका पिंजून काढणे म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्याच्या शरद पवार तयारीत असल्याच्या चर्चा संपूर्ण बारामतीसह राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

शरद पवार यांनी मंगळवारी बारामती तालुक्यातील निंबुत या गावापासून तीन दिवसीय दौऱ्याची केली. त्यांच्या या दौऱ्यात युगेंद्र पवार देखील सहभागी झाले आहेत. लोकसभा निवडणूक संपताच शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची ‘पेरणी’ सुरु केली आहे. शरद पवार सध्या बारामती आणि परिसराचा दौरा आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यात शेतकरी मेळावे होणार आहेत. ३ दिवसात शरद पवार ११ शेतकरी मेळाव्यांना शरद पवार हजेरी लावणार आहेत. त्यामुळे शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची अप्रत्यक्षपणे तयारी सुरु केली आहे.

अधिक वाचा  एससी,एसटीच्या आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करा-केशव उपाध्ये

३५ वर्षांपूर्वी शरद पवार यांनी बारामतीचा कारभार अजित पवार यांच्याकडे सोपवल्यावर कधीच असा बारामतीचा भाग पिंजून काढला नव्हता.  मात्र, आता शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे  यांनी सुनेत्रा पवार  यांच्या विरोधात ४८ हजारांचं मताधिक्य मिळाल्यानं अजित पवारांच्या समोर विधानसभेला मोठं आव्हान असणार आहे. आता खुद्द शरद पवार बारामती तालुका पिंजून काढत असल्यानं अजित पवारांच्या अडचणी वाढणार आहेत.

पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन

शरद पवारांनी नुकतंच दुष्काळी दौऱ्यादरम्यान स्थानिकांशी संवाद साधला. तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडे विनंती करणार आहे. मात्र सध्याचं सरकार माझं किती ऐकेल हे माहिती नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्य हातात पाहिजे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला जसं आपण साथ दिली तशीच  आगामी विधानसभा निवडणुकीतही साथ द्यावी, अशी साद पवारांनी शेतकऱ्यांना घातली.

अधिक वाचा  पुण्यात जमावबंदी आदेश लागु करण्याबाबत काय म्हणाले अजित पवार?

शरद पवार यांनी सोमेश्वरनगर इथं शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, अलीकडे मी लक्ष घालत नव्हतो. दुसऱ्यावर जबाबदारी दिली होती पण आता लक्ष घालावं लागेल. ज्याच्याकडे सत्ता आहे. त्यांनी लोकाच्या हिताची कामं केली पाहिजे पण तसे होताना दिसत नाही असेही पवार म्हणाले.

तर तुमची साथ लागेल

आपण जगात साखर पाठवतो. साखर जेवढी बाहेर जाईल तेवढा साखरेचा साखर दर वाढतो. साखर दराकडे केंद्र आणि राज्य सरकारच लक्ष नाही. मी पंतप्रधान मोदी यांना साखर दराबाबत पत्र लिहिले आहे. साखरेला दर मिळावा, त्याबाबत विचार करावा. त्यांनी निर्णय घेतला तर आनंद आहे आणि नाही घेतला तर तुमच्या माध्यमातून सांगायची वेळ आली तर तुमची साथ लागेल, असं आवाहन शरद पवार यांनी सोमेश्वरनगरच्या शेतकऱ्यांना केलं.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love