#Medha Kulkarni: मेधा कुलकर्णी यांचा राजकीय वनवास संपला: भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

Medha Kulkarni's political exile is finally over
Medha Kulkarni's political exile is finally over

Medha Kulkarni: पुण्यातील कोथरूड विधानसभा(Kothrud Vidhansabha) मतदार संघाच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी(Medha Kulkarni) यांचा अखेर राजकीय वनवास(political exile) संपला आहे. भाजपकडून(BJP) राज्यसभेसाठी(Rajya Sabha) महाराष्ट्रातून जाहीर करण्यात आलेल्या यादीत मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचे नाव जाहीर करण्यात आल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी अखेर करून दाखवले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.(Medha Kulkarni’s political exile is finally over)

कोथरूड मतदार संघाच्या आमदार असताना मेधा कुलकर्णी यांनी कायम सक्रिय राहात संपूर्ण  मतदार संघ बांधला होता. विधानसभेमध्येही त्या पुण्याच्या प्रश्नावर कायम आवाज उठवून आपल्या मतदारसंघाचे आणि पुण्याचे प्रश्न मांडत असत. उच्चभ्रू विशेषत: ब्राह्मण मंतदार संघ असलेल्या कोथरूड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने या मंतदारांकडून अपेक्षित असलेले काम पेशाने प्राध्यापक असलेल्या मेधा कुलकर्णी करत असल्याने त्या लोकप्रिय आमदार होत्या. मात्र, २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुण्यात पुनर्वसन करण्यासाठी अचानक मेधा कुलकर्णी यांची तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. दादा कोथरुडमध्ये निवडून आले, मंत्री झाले मात्र मेधा कुलकर्णी यांचा राजकीय वनवास सुरू झाला. २०१९ निवडणुकीदरम्यान, पक्ष मेधा ताईंची दखल घेईल असे खुद्द चंद्रकांत पाटील म्हणाले होते. उमेदवारी नाकारल्यानंतरही मेधा कुलकर्णी यांनी जाहीरपणे कधीही त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविली नाही.

अधिक वाचा  अदानी आणि अंबानींसाठी शेती कृषी क्षेत्र खुलं करण्याचा केंद्र सरकारचा डाव-राजू शेट्टी

त्यानंतर त्यांना राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. पक्षाने दिलेली ही जबाबदारी पार पाडताना मेधा कुलकर्णी यांनी अनेक कार्यक्रम घेत पक्षाचा नावलौकिक वाढवला . त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना राज्यसभेसाठी संधी दिली गेली. आज कुलकर्णी यांना थेट राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचा राजकीय वनवास संपल्याचे दिसून येत आहे. अखेर मेधाताईंनी करुन दाखवलंच, अशी भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. राज्यसभेसाठी भाजपने कुलकर्णी यांच्या नावाची वर्णी लावल्याने आता आगामी लोकसभेच्या भाजपच्या उमेदवारीमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा  निवडणुकीसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पुण्यात भाजपने यापूर्वी कसबा विधानसभेसाठी मुक्ता टिळक यांना तर मागील लोकसभेला गिरीश बापट यांना उमेदवारी दिली होती. काही दिवसांपूर्वीच टिळक आणि बापट या दोन्ही लोकप्रतिनिधींचे निधन झाल्याने सध्या भाजपकडे ‘ब्राह्मण’ समाजाचे प्रतिनिधीत्व नाही. या पार्श्वभूमीवर राज्यसभेसाठी प्राध्यापक मेधा कुलकर्णी यांच्या नावाचा विचार केला गेला असल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा  आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत-हर्षवर्धन पाटील

राज्यसभेसाठी भाजपने कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने जाहीर केलेल्या राज्यसभेच्या उमेदवारांच्या यादीत मेधा कुलकर्णी यांचे नाव आहे. केंद्रासह अनेक राज्यांमध्ये भाजपाचे संख्याबळ पाहता मेधा कुलकर्णी यांचा विजय सहज असून त्या खासदार होणार हे निश्चित झाले आहे.

पुणे लोकसभेची गणिते बदलणार

भाजपच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट या दोघांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे भाजपकडे ‘ब्राम्हण’ समाजाचे प्रतिनिधीत्व नाही. आमदार टिळक यांच्या निधनानंतर त्यांचे पती शैलेश टिळक, सुपुत्र कुणाल टिळक किंवा त्यांच्या परिवारातील व्यक्तीला भाजप संधी देईल, अशी चर्चा होती. परंतु, तसे झाले नाही. पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना  पक्षाने कसबा पोटनिवडणुकीसाठी संधी दिली होती. त्यावेळी भाजपने ‘ब्राह्मण ‘ समाजाला डावल्याची चर्चा सुरू झाली होती.मात्र, प्रा. मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याने पुणे लोकसभेची गणिते बदलणार असून भाजप पुणे लोकसभेसाठी बदलणार असल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू झाली आहे.

अधिक वाचा  बाबासाहेबांच्या स्मृती जपण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारने केलं : मुरलीधर मोहोळ

भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघ प्रचारक सुनील देवधर हे पुण्यामध्ये सक्रिय होत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला आहे. ते पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हेही इच्छुक असून त्यांनीही विविध कार्यक्रम घेत गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असणार असल्याने जातीय समिकरणाच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभेची गणिते बदलणार असल्याचे चर्चा आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love