सोनिया गांधी म्हणाल्या मला पक्षाचे नेतृत्व करण्यात रस नाही? कोण होणार काँगेसचा अध्यक्ष?


नवी दिल्ली( ऑनलाईन टीम)–सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष  पदाला एक वर्ष पूर्ण झाले असून आता पक्षाने नवीन अध्यक्ष निवडण्याची तयारी दर्शविली आहे. या दिशेने सोमवारी कॉंग्रेस कार्यकारी समितीची बैठक होणार आहे. तथापि, या बैठकीपूर्वी कॉंग्रेसचे अनेक नेते आणि माजी मंत्र्यांसह २३ जणांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात बदल करण्याची तसेच अध्यक्षपदासाठी निवडणुका घेण्याची मागणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, यापुढे पक्षाचे नेतृत्व करण्यात आपल्याला रस नसल्याचे श्रीमती सोनिया गांधी यांनी म्हटले असल्याचेही सूत्रांनी सांगितले. राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यावरून दोन गट पडले असल्याने कॉंग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण होणार या चर्चेला राजकीय वर्तुळात उधान आले आहे.

अधिक वाचा  श्रमिकांच्या हितासाठी काँग्रेस सदैव कटीबध्द : गोपाळदादा तिवारी

काही वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार सोनिया गांधी यांनी या २३ जणांच्या पत्राची दाखल घेतली असून त्यावर भाष्यही केले आहे. सोनिया गांधी यांनी या २३ जणांनी लिहिलेल्या पत्राला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, सर्वांनी मिळून पक्षासाठी एका प्रमुख शोधला पाहिजे. कारण आपल्याला आता ही जबाबदारी सांभाळण्याची इच्छा नाही.  

आपले नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर  पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की,  १० ऑगस्ट रोजी कॉंग्रेस कार्यकारी समितीने (सीडब्ल्यूसी) सोनिया गांधी यांना संघटनेचा कार्यभार पुन्हा स्वीकारण्याची विनंती केल्यानंतर गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व करण्यामध्ये रस नसल्याचे सांगितले होते.

दरम्यान, २०१९  लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवाची नैतिकता स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर, त्यांनी देखील काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष हा गांधी घराण्या व्यतिरिक्त इतर व्यक्ती असावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. काँग्रेस पक्षामध्ये पुढील अध्यक्षपदावरून दोन गट पडले आहेत. ज्यातील एक गट हा राहुल गांधी यांनीच काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी करणारा आहे. तर, दुसरा गट हा गांधी घराणे सोडून इतर अध्यक्ष करावा या विचारांचा आहे .  

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love